नवी दिल्ली : ब्लॅकनं तिकीट खरेदी केल्यानं तुमचा पैसा हा देशातील अतिरेकी घटनांसाठी वापरला जात असल्याची शक्यता आहे. कारण रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने ई- तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीतील 28 जणांना आरपीएफच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. काळाबाजार करणाऱ्या या टोळीची पाळमुळं दुबई, सिंगापूर, पाकिस्तानमध्ये असल्याची शक्यता आहे.


गुलाम मुस्तफाचा मोठा खुलासा

काळ्या बाजाराशी संबंधित गुलाम मुस्तफा या व्यक्तीला अटक करण्यात आले आहे. मुस्तफाची 10 दिवस चौकशी करण्यात आली. या चौकशीत काळ्या बाजाराशी संबंधित व्यक्ती तसेच टोळ्यांची माहिती त्यानी दिली आहे. रेल्वेच्या तिकिटांच्या काळाबाजारासाठी या टोळीने एक सॉफ्टवेअर विकसित केले होते. शेकडो आयडींच्यामार्फत हा खेळ सुरु होता. यावरुन काही मिनिटांत ही टोळी हजारो तिकिटांचा काळाबाजार करीत होती. दरम्यान, या रॅकेटच्या तिकिटांच्या काळाबाजारामुळे काही गरजवंतांना तिकिट उपलब्ध होऊ शकत नव्हते. सिंगापूर येथील एका सॉफ्टवेअर कंपनीने मदत केली असून मनी लॉंडरिंग संबंधित सिंगापूर पोलिस तपास करत आहे.

AC local | मध्य रेल्वेची 29 जानेवारीपासून एसी लोकल धावणार | ABP Majha



आरपीएफचे डीजी अरूण कुमार म्हणाले, या टोळीमध्ये एकूण 215 जणांचा समावेश आहे. टोळीच्या सेकेंड लेअरमध्ये 18 लोक आहे. या टोळीतील 28 जणांना आरपीएफच्या पोलिसांनी अटक केली आहे.

रोकड मिळवल्यानंतर हे लोक या पैशांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी करीत होते. अटक करण्यात आलेल्या लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या काळ्याबाजाराची मुळं आर्थिक घोटाळ्यांशी जोडलेली आहेत. इतकेच नव्हे मुस्तफाच्या लॅपटॉपमध्ये पोलिसांना एक अॅप्लिकेशन मिळाले आहे. या अॅप्लिकेशन वापर करून बनावट आधार कार्ड तयार केले जातात.

टोळीचा मास्टरमाईंड गुरूजी

टेक्नॉलॉजीचा दुरूपयोग करून ही टोळी पैसे कमवत होती. टोळीचा मास्टमाईंड गुरूजी आहे. दीड महिन्यात गुलाम मुस्तफाच्या बँक खात्यातून 17 लाख रूपये गुरूजीच्या खात्यात पाठविण्यात आले आहे. या टोळीचा संबंध तहरिक- ए- पाकिस्तानशी आहे. दुबई, पाकिस्तान, बांगलादेश आणि यूगोस्लावियाच्या काही टोळ्यांचा या मागे हात आहे. मुस्तफाच्या लॅपटॉपमधून पाकिस्तानातील काही मोबाईल नंबर मिळाले आहे. या टोळीची महिन्याची कमाई 15 कोटी आहे.