झेननं आगीतून 17 जणांचे प्राण वाचवले
22 आँगस्ट 2018 ला मुंबईतल्या परळ भागात 17 मजली इमारतीला 12 व्या मजल्यावर आग लागली होती. जेन त्याच इमारतीत 16 व्या मजल्यावर राहत होती. जेव्हा तिच्या आईवडिलांनी तिला उठवलं तेव्हा घरात सगळीकडे धूर पसरत होता. झेन धावत बाहेरच्या परिसरात गेली, तेव्हा तिला मदतीसाठी अनेकांचे आवाजही ऐकू येत होते. तिनं सर्वात आधी मेन स्विच बंद केला, नंतर अग्नीशमन दलाला फोन केला. शिवाय या सर्व लोकांना घेऊन ती एका सुरक्षित ठिकाणीही पोहचली. तिथे आपल्या शाळेत सांगितलेल्या आगीपासून बचाव करणाऱ्या प्रात्यक्षिकांचा वापर केला.
दादासाहेब फाळके सन्मानानंतर महानायक अमिताभ बच्चन म्हणाले...
आकाशने नदीत बुडणाऱ्या मायलेकींना वाचवले
औरंगाबादजवळ्या एका गावात राहणारा पंधरा वर्षांचा आकाश त्या दिवशी शाळेत निघाला होता. त्याचवेळी दुधना नदीच्या पुलावरुन जात असताना त्यानं नदीत एका महिलेला बुडत असताना पाहिलं. आजूबाजूला मदत करणारं कुणी दिसत नसल्यानं त्यानं आपली स्कूल बॅग बाजूला ठेवून 70 फूट उंच पूलावरुन नदीत उडी मारली. ज्या वेळी तो पोहत त्या महिलेच्या शेजारी पोहचला, तेव्हा तिच्यासोबत 3 वर्षांचं बाळही असल्याचं दिसलं. तेव्हा त्यानं आधी बाळाला बाहेर काढलं, आणि नंतर या महिलेचीही सुटका केली. ही महिला नदीत कपडे धुण्याचं काम करत होती. काम करताना शेजारी खेळणारं आपलं बाळ अचानक खोल पाण्यात शिरल्याचं लक्षात आल्यावर ती घाबरली. स्वतःला पोहता येत नाही हे विसरुन ती बाळाच्या रक्षणासाठी धावली होती.
ICC Awards 2019 | रोहित शर्माला आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर तर विराट कोहलीला स्पिरीट ऑफ क्रिकेट पुरस्कार | खेळ माझा | ABP Majha