एक्स्प्लोर
रोटोमॅक कर्ज घोटाळा 800 नव्हे, 3695 कोटींचा, सीबीआयची माहिती
रोटोमॅकचा मालक विक्रम कोठारीने विविध सात बँकांकडून कर्ज घेतलं, मात्र ते परत केलं नाही.
नवी दिल्ली : बँकांतील मोठ-मोठे घोटाळे समोर येत आहेत. शिवाय तपास जसा जसा पुढे जाईल, तशी तशी घोटाळ्याची रक्कमही वाढत आहे. 800 कोटी रुपयांहून सुरु झालेला रोटोमॅक या पेन कंपनीचा घोटाळा आता 3 हजार 695 कोटींवर गेला आहे. रोटोमॅकचा मालक विक्रम कोठारीने विविध सात बँकांकडून कर्ज घेतलं, मात्र ते परत केलं नाही. त्यामुळे तो आता सीबीआयच्या रडारवर आला आहे.
कर्ज घेतलेल्या बँकांमध्ये बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स यांचा सहभाग आहे. सीबीआयने विक्रम कोठारीच्या तीन ठिकाणांवर छापेमारी केली. लवकरच विक्रम कोठारीला अटकही केली जाऊ शकते.
सध्या विक्रम कोठारी, त्याची पत्नी आणि मुलाची कानपूरमध्ये सीबीआय चौकशी सुरु आहे. हा घोटाळा 800 कोटींचा नाही, तर 3 हजार 695 कोटी रुपयांचा आहे. कोठारी कानपूरमधील रोटोमॅक ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मालक आणि संचालकीय व्यवस्थापक आहे. सीबीआयने अनेक बनावट कागदपत्रही जप्त केले आहेत, ज्यातून हा घोटाळा कधीपासून करण्यात आला, ते समोर आलं आहे.
काय आहे प्रकरण?
कानपूरचं कोठारीचं माल रोड येथील कार्यालय गेल्या आठवड्यात बंद अवस्थेत आढळून आलं होतं. बँक ऑफ बडोदाकडून मिळालेल्या तक्रारीनंतर सीबीआयने कानपूरमधील कोठारीच्या तीन ठिकाणांवर छापेमारी केली. कानपूरमध्ये कोठारी, त्याची पत्नी आणि मुलाची चौकशी करण्यात आल्याची माहिती सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली.
रविवारी रात्री कोठारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने अलाहाबाद बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑप बडोदा, इंडियन ओव्हरसीज बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियाकडून 800 कोटींचं कर्ज घेतलं होतं, अशी माहितीही सीबीआय अधिकाऱ्याने दिली.
विक्रम कोठारी कोण आहे?
विक्रम कोठारी पान परागशीही संबंधित आहे. मनसुख भाई कोठारी यांचं निधन झाल्यानंतर त्यांची दोन मुलं दीपक कोठारी आणि विक्रम कोठारी यांनी उद्योग वाटून घेतले. विक्रम कोठारीकडे पेन बनवणारी कंपनी रोटोमॅक आली. अभिनेता सलमान खानला रोटोमॅकचा ब्रँड अॅम्बेसिडर बनवण्यात आलं. एक काळ असा होता की, प्रत्येकाच्या खिशात रोटोमॅक पेन असायचा.
संबंधित बातमी :
रोटोमॅकचा 800 कोटींचा कर्ज घोटाळा, सीबीआयची छापेमारी सुरु
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
विश्व
राजकारण
विश्व
Advertisement