एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मराठी नगरसेवकांवर कारवाईसाठी कर्नाटक थेट कायदा बदलणार?
‘जय महाराष्ट्र’ घोषणेवर बंदी घालण्याच्या घोषणेमुळे वादग्रस्त ठरलेले कर्नाटकचे नगरविकास खात्याचे मंत्री रोशन बेग यांनी आता मराठी नगरसेवकांवर कारवाई करण्यासाठी कायदा दुरुस्ती करण्याचे सूतोवाच त्यांनी केले आहे.
बेळगाव : मराठी नगरसेवकांवर कारवाई करण्यासाठी कर्नाटक सरकार कायदा बदलणार का, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. कारण नगरविकास खात्याचे मंत्री रोशन बेग यांनी तसा सूतोवाच केला आहे.
‘जय महाराष्ट्र’ घोषणेवर बंदी घालण्याच्या घोषणेमुळे वादग्रस्त ठरलेले कर्नाटकचे नगरविकास खात्याचे मंत्री रोशन बेग यांनी आता मराठी नगरसेवकांवर कारवाई करण्यासाठी कायदा दुरुस्ती करण्याचे सूतोवाच त्यांनी केले आहे.
काँग्रेस विधिमंडळाच्या सदस्यांची बैठक झाली ,त्या बैठकीत रोशन बेग यांनी आपला मनोदय व्यक्त केला.
मंगळवारी काही स्वयंघोषित कन्नड नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन काळ्या दिनावर बंदी घाला, काळ्या दिनात सहभागी झालेल्या नगरसेवकांवर कारवाई करा अशी मागणी केली होती.
कायद्यानुसार कोणतीही कारवाई नगरसेवकांवर करता येत नाही म्हणून रोशन बेग यांनी महापालिका कायद्यात दुरुस्ती करून राज्यविरोधी कारवाई किंवा घोषणा देणाऱ्या नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द करण्याची योजना रोशन बेग आखत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
सोलापूर
Advertisement