Nitin Gadkari: केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी संसदेत देशातील रस्त्यांचा रोडमॅप मांडला. तसेच भारतात 2024 पर्यंत अमेरिकेसारखे रस्ते बनवले जातील, असंही त्यांनी संसदेत म्हटलंय. येत्या डिसेंबरपर्यंत अनेक शहरे दिल्लीपासून केवळ दोन तासांच्या अंतरावर असतील. एवढेच नव्हेतर, श्रीनगर ते मुंबईचा प्रवास केवळ 20 तासांचा असेल, असंही नितीन गडकरी म्हणाले आहेत.
नितीन गडकरी काय म्हणाले?
"मला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचे एक वाक्य नेहमी आठवतं. अमेरिका देश श्रीमंत आहे म्हणून येथील रस्ते चांगले नाहीत. तर, अमेरिका श्रीमंत आहे कारण तिथे चांगले रस्ते आहेत. 2024 च्या अखिरेस भारतातील रस्ते पायाभूत सुविधा अमेरिकेच्या बरोबरीनं असतील, अशी मी खात्री देतो. दिल्लीहून मेरठ चाळीस मिनिटांच्या अंतरावर आहे. मेरठचे लोक कॅनॉट प्लेससला जाऊन आयस्क्रीम खातात आणि पुन्हा घरी परत येतात", असं उदाहरण नितीन गडकरी यांनी संसदेत दिलं.
मोदी है तो मुमकीन है, गडकरी है तो मुमकीन है...
लोकसभेत ‘2022-23' या वर्षासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील अनुदानाच्या मागण्या’ या विषयावर चर्चा सुरू झाली. त्यावेळी भाजपचे भाजपचे खासदार तापीर गाव यांनी नितीन गडकरींचं कौतूक केलं. "मी नितीन गडकरी यांना ‘स्पायडरमॅन’ असं नाव दिलंय. कारण, त्यांनी रस्त्यांचं जाळं विणलंय. मोदी सरकार आल्यानंतर चीनच्या सीमेजवळ रस्ते बांधणीचं काम वेगानं सुरू आहे". आपल्या राज्यातील अनेक रस्त्यांच्या बांधकामाचा संदर्भ देत तापीर यांनी मोदी है तो मुमकीन है, गडकरी है तो मुमकीन है, अशा घोषणा दिल्या.
हे देखीला वाचा-
- बंगालमधील राजकीय हिंसेत आठ जणांचा मृत्यू, केंद्राने ममता सरकारकडून मागवला अहवाल
- Delhi : दिल्लीत आता एकच महापालिका! तीनही महापालिकांचे एकत्रिकरण होणार; विधेयकाला केंद्राची मंजुरी
- क्या राम, क्या रहीम, सब एक है, राम मंदिरासाठी मुस्लिम कुटुंबाकडून 2.5 कोटींची जमीन दान!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha