Dawood Ibrahim Kaskar : महाराष्ट्रचं अर्थसंकल्पीय अधिवेशन कुख्यात डॉन Dawood Ibrahim Kaskar पाहत असेल का? पाहत असेल तर त्याच्या मनात काय होत असेल?, असा प्रश्न सर्वांनाच पडत असेल. त्याच कारण म्हणजे, हल्ली राज्यात सुरु असणाऱ्या वाक्युद्धावरून. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये देशद्रोह, नवाब मलिक, आणि Dawood यांच्यावरून चांगलीच जुंपली आहे. त्यात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे pendrive bomb ने राज्य सरकारवर एकापाठोपाठ एक असे दोन मोठे आघात केले आहेत. 14 मार्च रोजी देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात एक pendrive सदर करत Mudassir lambe याचं नाव घेत Dawood सोबत संबंध असणाऱ्या लोकांना सरकारनियुक्त केल्याचा गंभीर आरोप केला आणि वातावरण चांगलंच तापलं. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आणि एकाच नाव राज्यभरात गाजू लागलं ते म्हणजे, Dawood. 


बर, आज आपला मूळ विषयच Dawood आहे. 1993 चा बॉम्बस्फोट झाल्यानंतर Dawood नं जी धूम ठोकली, तो काही आजवर परतला नाही. आता तो कसा दिसतो? हे कदाचितच कुणाला माहीत असेल पण भारताची एक संपूर्ण पिढी Dawoodचे जुने फोटो पाहून मोठी झाली आहे. 


त्या फोटोंमध्ये एक फोटो आहे, जो सर्वांचंच लक्ष वेधून घेतो. तो फोटो म्हणजे, Dawood चा Sharjah स्टेडीयमवरचा फोटो. पिवळ्या रंगच टीशर्ट, मोठे आणि काळेभोर केस, ओठांवर जाड मिशी, डोळ्यांवर काळा चष्मा आणि हातात सिगारेट. आज देखील Google वर Dawood म्हणून शोधलं की, अनेक वेळा हाच फोटो दिसून येतो. कदाचित हाच Dawood चा शेवटचा फोटो असावा. पण कुणी काढला हा फोटो? नेमका कुठं काढला हा फोटो? काय आहे या फोटोमागची कहाणी? 


1985 पर्यंत Dawoodचं नाव भारत मोठं झालं होतं, पण त्याचे फोटो काही उपलब्ध नव्हते. सर्वांना Dawood माहीत होता, पण दिसतो कसा? हे कुणालाच माहीत नव्हतं. त्यावेळी भारत – पाकिस्तानची दुबईमध्ये एक क्रिकेटचा सामना झाला. त्या सामन्याला Dawood आपल्या गुंडांसह हजार होता. भारताची मॅच होती म्हणून की, शारजाहच्या स्टेडीयमवर भारतातून अनेक पत्रकार, छायाचित्रकार दाखल झाले होते. त्यातच होते एक India Today चे छायाचित्रकार भवन सिंह. भवन सिंह स्टेडीयमवर दोन कॅमेरे घेऊन पोहोचले होते. ते आपल्या कामात व्यस्त असताना त्यांच्या कानावर काही उद्गार पडले. ते उद्गार होते Dawood... Dawood... भवन हे नाव ऐकून होते. त्यांनी त्या गदारोळाच्या दिशेन कूच केली, आणि त्यांनी पाहिलं की,  एक व्यक्ती काही अंगसंरक्षकांच्या घोळक्यात बसला होता. त्यांना कळून चुकलं की, ही कुणी तरी मोठी व्यक्तीच असावी आणि किंबहुना Dawoodचं नाव ऐकलं होतं, पण त्यांनी त्याला कधीच पहिलं नव्हतं. भवन सिंह यांनी आपल्या कॅमेऱ्याची फ्रेम सेट केली आणि फोटो काढणार इतक्यातच Dawoodच्या काही माणसांनी त्यांना रोखलं. त्यात त्याचा तत्कालीन उजवा हात असणाऱ्या छोटा राजनचाही समावेश होता. परंतु Dawood नं त्यांच्या माणसांना इशारा करत 'काढू दे फोटो' असं सांगितलं आणि भवन याचं बोट पटकन कॅमेऱ्याच्या बटनावर गेलं आणि काहीच सेकंदात जगातील कुख्यात गुंडाचे चार ते पाच फोटो त्यांनी काढले. 


भारतात परत येताच त्यांनी हे फोटो आपल्या संपादकांना दाखवले. संपादकांसह त्यांचे इतर सहकारी देखील ते फोटो पाहून  आश्चर्यचकीत झाले. आता कसोटी होती ती म्हणजे, फोटोत दिसणारी व्यक्ती नक्की दाऊदच आहे का? हे जाणून घेण्याची. कारण त्याला उघड उघड फार कमी लोकांनी पाहिलं होतं. अखेरीस त्यावरही शिक्कामोर्तब झाला आणि दाऊद Ibrahim कासकरचा चेहरा भारतानं पहिल्यांदा पहिला. 


कदाचित, जर भवन सिंह नसते तर Dawoodचे इतके चकाचक फोटो जगाने कधीच पहिले नसते. भवन सिंह यांचा सरकारे काहीच वर्षांपूर्वी Life Time Achievement Award For Photo Journalism देऊन गौराव केला.