West Bengal: पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट येथे सोमवारी झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांच्या नेतृत्वाखाली भाजप पश्चिम बंगालच्या खासदारांनी आज गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर खासदारांनी दावा केला की, अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की त्यांनी 72 तासांत राज्य सरकारकडून या प्रकरणी अहवाल मागून घ्यावा.
पश्चिम बंगालचे डीजीपी मनोज मालवीय यांनी मंगळवारी दुपारी सांगितले की, या हिंसाचारात 10 नव्हे तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. ते म्हणाले, "आज सकाळी एका घरातून सात मृतदेह सापडले आहेत. 10 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती, मात्र ही संख्या चुकीची होती. यामध्ये काल (सोमवारी) आठ जणांचा मृत्यू झाला आहे." या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मनोज मालवीय म्हणाले की, काल (सोमवारी) रात्री तृणमूल काँग्रेस नेते बहादूर शेख यांच्या हत्येची बातमी आल्यानंतर तासाभरात जवळपास आत ते आठ घरे जाळण्यात आली. याप्रकरणी 11 जणांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. या घटनेनंतर रामपूरहाटचे एसडीपीओ आणि प्रभारी यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे.
भाजपचा ममता सरकारवर हल्लाबोल
हिंसाचाराच्या या प्रकरणावरून भारतीय जनता पक्षाने ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. पश्चिम बंगालचे भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी कोलकाता येथे सांगितले की, "संपूर्ण राज्याची स्थिती अत्यंत नाजूक आहे. गेल्या एका आठवड्यात राज्याच्या विविध भागात 26 जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. कायदा आणि पश्चिम बंगालमध्ये सुव्यवस्था बिघडली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
- Hiranandani Group Raid : हिरानंदानी समूह IT च्या रडारवर; मुंबई, बंगळुरुसह देशभरातल्या 24 ठिकाणाच्या मालमत्तांवर छापेमारी
- गोव्यात भाजप सरकारच्या शपथविधीला पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित!
- Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 1581 नवीन रुग्णांची नोंद, कोरोनाबाधितांनी ओलांडला 4 कोटी 30 लाखांचा टप्पा