Driving Licence : ज्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्स, लर्निंग लायसन्स आणि कंडक्टर लायसन्सची वैधता संपत आहे अशा लोकांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) मोठा दिलासा दिला आहे. आता परवान्याची वैधता कालावधी 29 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक परिपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने परिपत्रकात म्हटले आहे की, सारथी पोर्टल (https://sarathi.pariva han.gov. in) मध्ये पायाभूत सुविधांशी संबंधित कारणांमुळे, अर्जदारांना 31 जानेवारी ते 12 फेब्रुवारी या कालावधीत अर्ज करण्याची परवानगी दिली होती. पण या दरम्यान परवाना संबंधित सेवा मिळविण्यात अडचणींना सामोरे जावे लागेल.
सर्व्हर डाऊनचा फटका नागरिकांना
आरटीओ कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी आणि सेवा सुरू ठेवण्यासाठी, पोर्टलवरील ऑनलाइन सेवा नागरिकांसाठी अंशतः डिसेबल करण्यात आल्या होत्या. जेणेकरून आरटीओ खाते सुरळीत काम करू शकेल. अशा परिस्थितीत ऑनलाइन सेवा अंशतः बंद झाल्यामुळे अनेक अर्जदार शुल्क भरू शकत नाहीत, ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण, शिकाऊ परवान्यासाठी बुक स्लॉट आणि ड्रायव्हिंग कौशल्य चाचणीसाठी अर्ज करू शकत नाहीत.
वाहतूक पोर्टलवर नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने निर्णय घेतला आहे की शिकाऊ परवाना, ड्रायव्हिंग लायसन्स आणि कंडक्टर लायसन्स ज्यांची वैधता 31 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत संपली आहे, त्यांच्यावर कोणताही दंड न आकारता 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत वैध मानले जाईल. अशी कागदपत्रे 29 फेब्रुवारीपर्यंत वैध मानावीत अशा सूचना अंमलबजावणी अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. मंत्रालयाला मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या ज्यात परिवहन पोर्टलवर बरेच लोक अर्ज करू शकत नसल्याचे सांगण्यात आले होते.त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
लायसन्स कसे काढाल?
तुम्हाला शिकाऊ परवान्यासाठी (Lerning Licence) अर्ज करायचा असेल किंवा कायमस्वरूपी परवाना मिळवायचा असेल तर तुम्ही अगदी सहज ऑनलाइन अर्ज करू शकता. तर आता शिकाऊ परवाना मिळवण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन झाली आहे. तसेच, शिकाऊ परवाना डिजिटल पद्धतीनं मिळू शकतो. तर कायमस्वरूपी परवाना मिळवण्यासाठी आरटीओला जावं लागतं.
कायमस्वरूपी परवाना घेण्यासाठी परिवहन कार्यालयात जावं लागतं. शिकाऊ परवान्यासाठी अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम अधिकृत साइटला भेट द्या.
(https://sarathi.parivahan.gov.in/sarathiservice/stateSelection.do). येथे तुम्हाला एक संपूर्ण यादी मिळेल ज्यामध्ये तुम्हाला Learner License चा पर्याय निवडावा लागेल. येथे तुम्हाला आधारचा पर्यायही दिसेल. तिथे तुम्हाला तुमच्या आधार कार्डाचे तपशील टाकावे लागतील. यासोबतच मोबाईल नंबरवर एक ओटीपीही येईल. सर्व तपशील टाकल्यानंतर तुम्हाला पेमेंट पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर तुम्हाला 50 रुपयांची फी भरावी लागेल. तुम्ही या प्रक्रियेद्वारे अर्ज केल्यास लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स फक्त 7 दिवसांत थेट तुमच्या घरी पोहोचेल.
ही बातमी वाचा :