Driving License Online Process : चारचाकी किंवा दुचाकी चालवण्यासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे. पण ड्रायव्हिंग लायसन्स काढणं किंवा अपडेट करण्याची प्रक्रिया अत्यंत अवघड असते, असा अनेकांचा समज असतो. पण तसं नाही. आधी RTO मध्ये जाऊन कागदपत्र भरून सबमिट करणं, त्यानंतर पुन्हा पुढच्या प्रक्रियेसाठी जाणं अशा अनेक गोष्टींसाठी सतत RTO च्या फेऱ्या माराव्या लागतात. पण आता घरबसल्या सहजसोप्या पद्धतीनं तुम्ही ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकता. 


वाहन चालवणाऱ्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे, एक महत्त्वाचं कागदपत्र. जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License News) नसेल, किंवा त रिन्यू करायचं असेल, तर तुम्ही ऑनलाईन (Online Process) झटपट अर्ज करु शकता. 


भारत सरकारनं ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याची प्रक्रिया डिजिटल केली आहे. ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करून तुम्ही अगदी सहज परवाना मिळवू शकता. भारत सरकार कलम 4 अंतर्गत प्रत्येक भारतीयाला शिकाऊ परवाना ठेवण्याची परवानगी देते. विशेष म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स वयाच्या 16व्या वर्षीच मिळू शकते. मात्र या परवान्यामुळे तुम्ही केवळ विदआउट गेअर गाड्या चालवू शकता. 


तुम्हाला शिकाऊ परवान्यासाठी (Lerning Licence) अर्ज करायचा असेल किंवा कायमस्वरूपी परवाना मिळवायचा असेल तर तुम्ही अगदी सहज ऑनलाइन अर्ज करू शकता. तर आता शिकाऊ परवाना मिळवण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन झाली आहे. तसेच, शिकाऊ परवाना डिजिटल पद्धतीनं मिळू शकतो. तर कायमस्वरूपी परवाना मिळवण्यासाठी आरटीओला जावं लागतं.


कायमस्वरूपी परवाना घेण्यासाठी परिवहन कार्यालयात जावं लागतं. शिकाऊ परवान्यासाठी अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम अधिकृत साइटला भेट द्या.  
(https://sarathi.parivahan.gov.in/sarathiservice/stateSelection.do). येथे तुम्हाला एक संपूर्ण यादी मिळेल ज्यामध्ये तुम्हाला Learner License चा पर्याय निवडावा लागेल. येथे तुम्हाला आधारचा पर्यायही दिसेल. तिथे तुम्हाला तुमच्या आधार कार्डाचे तपशील टाकावे लागतील. यासोबतच मोबाईल नंबरवर एक ओटीपीही येईल. सर्व तपशील टाकल्यानंतर तुम्हाला पेमेंट पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर तुम्हाला 50 रुपयांची फी भरावी लागेल. तुम्ही या प्रक्रियेद्वारे अर्ज केल्यास लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स फक्त 7 दिवसांत थेट तुमच्या घरी पोहोचेल.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Driving Licence: घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण करायचे आहे? हा आहे सोपा मार्ग