रिंकू शर्मा हत्येप्रकरणी कंगनाचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा, म्हणाली...
कंगनाने बजरंग दलचा कार्यकर्ता रिंकू शर्माच्या हत्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आता कंगनाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.
Mangolpuri murder case : दिल्लीच्या मंगोलपुरीमधील रिंकू शर्मा (Rinku Sharma Murder case) हत्या प्रकरणाची सध्या देशभर चर्चा सुरु आहे. बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतने देखील या विषयावर ट्वीट करत आहे. आज पुन्हा एकदा कंगनाने बजरंग दलचा कार्यकर्ता रिंकू शर्माच्या हत्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आता कंगनाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.
कंगना रनौत आपल्या ट्वीटमध्ये म्हणाली, "प्रिय अरविंज केजरीवालजी, मला आशा आहे की तुम्ही रिंकू शर्माच्या परिवाराची भेट घेऊन त्यांना सपोर्ट कराल, तुम्ही राजकरणी आहे, आशा आहे की स्टेटसमॅन देखील बनाल."
Dear @ArvindKejriwal ji I really hope you meet Rinku Sharma’s family and support them also, you are a politician hope you become a statesman also. https://t.co/SpPyKWYUnZ
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 13, 2021
दिल्लीत एका 25 वर्षाच्या युवकाच्या हत्येनं राजकीय वातावरण पेटलं आहे. रिंकू शर्मा नावाच्या या युवकाला लाठया-काठयांनी बदडून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात दानिश, इस्लाम, मेहताब आणि जाहिद या युवकांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीतल्या मंगोलपुरी भागात बुधवारी रात्री ही घटना घडली. घटनेची भीषणता काही व्हिडिओमधूनही समोर येत आहे.
रिंकू शर्मा आणि त्याचे हे मित्र एका वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाले होते. याच मित्रांसोबत रिंकूनं काही दिवसांपूर्वी एक रेस्टाँरंटचा बिझनेस सुरु केला होता. पण हा धंदा तोट्यात गेला होता. त्यामुळे वाद झाल्याचं पोलिस सांगत आहेत. पण यात इतर काही धार्मिक अँगल आहे का याचाही शोध आता पोलीस घेत आहेत.
Rinku Sharma Murder | दिल्लीत भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता रिंकू शर्माची हत्या