एक्स्प्लोर

कर्नाटकात रिसॉर्ट पॉलिटिक्स, काँग्रेसकडून 100 रुम बूक

फोडाफोडी टाळण्यासाठी काँग्रेसने ईगल्टन रिसॉर्टमध्ये 100 रुम बूक केल्या आहेत, जिथे काँग्रेसच्या आमदारांना ठेवलं जाईल. भाजपने काही पाऊल उचलण्याअगोदरच काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे.

बंगळुरु : कर्नाटकात रिसॉर्ट पॉलिटिक्सला सुरुवात झाली आहे. फोडाफोडी टाळण्यासाठी काँग्रेसने ईगल्टन रिसॉर्टमध्ये 100 रुम बूक केल्या आहेत, जिथे काँग्रेसच्या आमदारांना ठेवलं जाईल. भाजपने काही पाऊल उचलण्याअगोदरच काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे गुजरातमध्ये अहमद पटेल यांच्यावेळी जी राज्यसभेची निवडणूक झाली होती, त्यावेळीही याच रिसॉर्टमध्ये आमदारांना ठेवण्यात आलं होतं. कर्नाटकात सत्तेचा पेच निर्माण झाल्यानंतर भाजप, काँग्रेस आणि जेडीएसकडूनही सत्ता स्थापनेचा दावा केला जात आहे. भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार कर्नाटकमधील भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांनी आज विधीमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत येडियुरप्पांची विधीमंडळ नेते म्हणून निवड होईल आणि त्याबाबतची माहिती राज्यपालांना दिली जाईल. म्हणजेच भाजपकडून सरकार स्थापनेचा दावा केला जाईल. मात्र भाजपकडे बहुमतासाठी 8 जागांची कमी आहे. काँग्रेस-जेडीएस आघाडी दुसरीकडे भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने सर्वात कमी जागा मिळालेल्या जेडीएसला पाठिंबा दिला आहे. इतकंच नाही तर जेडीएस नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस मिळून सरकार स्थापन करेल, असा दावा त्यांनी केला आहे. या दोन्ही पक्षांचे मिळून काँग्रेस 78 + जेडीएस 38 = 116 आमदार होतात. त्यामुळे यांची संख्या भाजपपेक्षा जास्त होते. त्यामुळे आता राज्यपाल कोणता निर्णय घेतात, याकडे अवघ्या कर्नाटकसह देशाचं लक्ष लागलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 भाजप 104 काँग्रेस 78 जनता दल (सेक्युलर) 37 बहुजन समाज पार्टी 1 कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1 अपक्ष 1 एकूण 222 संबंधित बातम्या :

कर्नाटक LIVE: आमदार फोडण्यासाठी ED, IT ची धमकी, काँग्रेसचा आरोप

कर्नाटकात भाजपची काल रात्री एक जागा कमी झाली, आज वाढली!

कर्नाटकच्या विजयाचा आनंद, मात्र वाराणसीच्या दुर्घटनेने मन हेलावलं : मोदी

कर्नाटक: भाजप आज सत्ता स्थापनेचा दावा करणार

काँग्रेसचे 7, जेडीएसचे 4 आमदार भाजपच्या संपर्कात?

महत्त्वाच्या बातम्या

काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
Embed widget