नवी दिल्ली: भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या दिवसाचे औचित्य साधून सकाळी राजपथवर भारतीय संस्कृती आणि लष्कराच्या ताकतीचं दर्शन घडवण्यात आलं. तर संध्याकाळी विजय चौकात एक हजार ड्रोन्सच्या सहाय्याने रोषणाई करण्यात आली. त्यामुळे विजय चौक चांगलाच उजाळून निघाला आहे. 


आकाशात एक हजार डोन्सच्या सहाय्याने जवळपास 10 मिनीटे ही नेत्रदिपक रोषणाई सुरू होती. या दरम्यान भारताचा नकाशा आणि महात्मा गांधींची प्रतिमा आकाशात निर्माण करण्यात आली होती. हा अनोखा नजारा पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली. 


 






केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी काही दिवसांपूर्वी याची माहिती दिली होती. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, चीन, रशिया आणि ब्रिटननंतर तब्बल 1000 ड्रोनच्या मदतीने अशी आकर्षक रोषणाई करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत प्रौद्योगिकी विकास बोर्ड आणि दिल्लीतील एक स्टार्ट अप विभागाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. 


देश आज 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. त्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही देशाची राजधानी दिल्लीतील राजपथ येथे राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत देशाच्या शक्ती आणि संस्कृतीची भव्य परेड आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. पंतप्रधानांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. आजच्या परेडचे मुख्य आकर्षण म्हणजे 75 विमाने आणि हेलिकॉप्टरचा फ्लायपास्ट हे होते. 


महत्त्वाच्या बातम्या :