Republic Day 2022 :  राजपथावर आज 73व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आटोपताच राष्ट्रपती त्यांच्या भवनाकडे परतण्यासाठी निघाले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे देखील त्यांच्यासोबत होते. राष्ट्रपतींना भवनात घेऊन जाण्यासाठी अंगरक्षक येताच पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अंगरक्षकांच्या ताफ्यातील एका घोड्याला गोंजारलं. ही दृश्य सोशल मीडियात चांगलीच चर्चेत आली. 


तर, या घोड्याचं नाव विराट असून तो 19 वर्षाच्या सेवेनंतर आज निवृत्त झाला आहे. गेल्या 13 वर्षांपासून भारताच्या राष्ट्रपतींना सन्मानाने समारंभात घेऊन जाण्याचा मान विराटकडे होता. भारतीय लष्कराने राष्ट्रपतींच्या अंगरक्षकाचा चार्जर म्हणून विराटचा विशेष सन्मान केला आहे. विराटच्या गुणवत्तेसाठी आणि सेवांसाठी त्याला चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमंडेशन कार्डही देण्यात आलं आहे. दरम्यान आज प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या समारोपानंतर पीबीजीने विराटच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. 






विराट चार्जरच्या रुपात राष्ट्रपतीच्या सेवेत गेल्या 13 वर्षापासून आहे.  Republic Day Parade, Beating the Retreat Ceremony,राष्ट्रपतींद्वारे केल्या जाणाऱ्या  ओपनिंग अॅड्रेस ऑफ पार्लिमेंट आणि वेगवेगळ्या देशाच्या  Head of Statesच्या स्वागत समारंभात सहभागी झाला आहे.  विराटने या अगोदर माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी आणि रामनाथ कोविंद यांना प्रोटोकॉलनुसार सरमोनिअल परेड्सला Escort चा गौरव मिळाला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha