एक्स्प्लोर

Amarnath Yatra: अमरनाथ यात्रा 28 जूनपासून सुरू होणार, आजपासून नोंदणी सुरू

अमरनाथ यात्रा 28 जूनपासून सुरू होणार असून 22 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे, देशभरातून भाविक वर्षभर अमरनाथच्या यात्रेच्या प्रतीक्षेत असतात. आजपासून या यात्रेची नोंदणी सुरू होणार आहे,

नवी दिल्ली : यंदाची वार्षिक अमरनाथ यात्रा 28 जूनपासून सुरू होणार आहे. आज जम्मूमध्ये श्री अमरनाथ श्राईन बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागील वर्षी कोरोना साथीच्या आजारामुळे वार्षिक अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती. पण, यावर्षी 28 जूनपासून ही यात्रा सुरू होणार आहे. श्री अमरनाथ श्राईन बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने जाहीर केलेल्या कोविड 19 नियमवालीनुसार यात्रा पार पडणार आहे. 56 दिवस चालणाऱ्या या यात्रेची नोंदणी आजपासून सुरू होणार आहे. 

श्री अमरनाख श्राईन बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीतीश्वर कुमार म्हणाले, दोन्ही मार्गांसाठीची नोंदणी देशातील 446 बँकातील शाखांच्या माध्यमातून 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. ज्यामध्ये पंजाब नॅशनल बँक (316),  जम्मू काश्मीर बँक (90) आणि यस बँकेचा (40) समावेश आहे. 

ही यात्रा 28 जूनपासून सुरू होणार असून 22 ऑगस्टपर्यंत  सुरू राहणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 13 वर्षांखालील मुले तसेच 75 पेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक आणि  सहा आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीच्या गर्भवती महिला यांना यात्रेत सहभागी होता येणार नाही. यात्रेकरूंना ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा बोर्डाने दिली आहे. वेबसाईटवर राज्यनिहाय बँक शाखांची माहिती आणि यात्रेचा अर्ज उपलब्ध आहे. नोंदणी करताना यात्रेकरुंना आरोग्य दाखला जोडणे बंधनकारक आहे. 

 विशेष म्हणजे, देशभरातून भाविक वर्षभर अमरनाथ यात्रेच्या प्रतीक्षेत असतात. श्री अमरनाथ श्राईन बोर्ड भाविकांसाठी ही यात्रा सुलभ होण्यासाठी व्यवस्था करते.यात्रेकरुंच्या मुक्काम आणि खाण्यापासून बसेसची व्यवस्था केली जाते. त्याचबरोबर या प्रवासाच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. या यात्रेचा जम्मू-काश्मीरच्या व्यवसायावरही प्रभाव पडतो. व्यापाऱ्यांना या यात्रेकडून मोठ्या आशा आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती.  जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात.

अमरनाथ यात्रेचं महत्त्व

हिंदू भाविकांच्या पवित्र स्थानांपैकी एक म्हणजे अमरनाथ होय. जम्मू काश्मीरमधील अनंतनाग परिसरातील बालाटल क्षेत्रात अमरनाथ गुहा आहे. या गुहेत बर्फाचं शिवलिंग असतं आणि ते थंडीच्या वातावरणातच आकार घेतं. आषाढ पौर्णिमा ते रक्षाबंधन-नारळी पौर्णिमेपर्यंत हे शिवलिंग पूर्ण आकार घेतं. त्यामुळे या काळात शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.

अमरनाथ गुहेची अख्यायिका

भगवान शंकराने याच गुहेत आपलं अस्तित्व आणि अमरत्वाबाबतचं रहस्य पार्वतीला सांगितल्याची अख्यायिका आहे. या गुहेचा उल्लेख काश्मीरी इतिहासकार कल्हण यांनी 12व्या शतकात रचलेलं महाकाव्य 'राजतरंगिणी'तमध्येही आहे. या गुहेच्या छतातून थेंब थेंब पाणी गळतं तेच पाणी गोठून एक विशालकाय रुप धारण करतं. याचा आकार शिवलिंगाप्रमाणे असतो, त्यामुळे हिंदू भाविक दरवर्षी इथे दर्शनासाठी येतात.

महत्त्वाच्या बातम्या

उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
Ashutosh Ranka on PM Modi: आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट करुन टाकला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट केला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Abhijit Dipke Grandmother Death: आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
Abhijeet Dipke : अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
Ashutosh Ranka on PM Modi: आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट करुन टाकला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट केला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Panchayat Raj Abhiyan : पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
Abhijit Dipke Grandmother Death: आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
IND A vs AUS A 3rd ODI : ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
Ranji Trophy : स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
Mumbai Crime Sion Hospital: सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
NZ vs IND ODI Squad : भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
Embed widget