एक्स्प्लोर

पुढे काय होणार? NEET पेपरफुटीनंतर RCC क्लासमधील विद्यार्थी-पालक संभ्रमात, आर्थिक आणि मानसिक संकट

NEET Paper Leak : NEET पेपरफुटी प्रकरणानंतर लातूरच्या RCC कोचिंग क्लासचे विद्यार्थी आणि पालकांमध्ये पुढील तयारी, नवीन क्लास आणि आर्थिक ताणाबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

लातूर : NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली असून लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केंद्र सरकारने पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यार्थ्यांपुढे नव्याने तयारीचे मोठे आव्हान उभं राहिलं आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा सर्वाधिक मानसिक आणि शैक्षणिक फटका बसला आहे तो लातूरच्या आरसीसी (RCC) कोचिंग क्लासमधील विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चौकशा, सीबीआयची कारवाई आणि शिवराज मोटेगावकर यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे आरसीसीचे भवितव्य काय होणार, याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्षे मेहनत घेत आणि लाखो रुपये खर्च करून या संस्थेत प्रवेश घेतला होता. आता मात्र पुढील दीड महिन्यांच्या तयारीसाठी कुठे जावे, कोणत्या शिक्षकांवर विश्वास ठेवावा आणि अभ्यासाची दिशा कशी ठरवावी, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम आहे.

NEET Re Exam : नव्या तयारीसाठी पर्यायी क्लासेसचा पुढाकार

लातूरसह राज्यातील अनेक खासगी कोचिंग क्लासेसनी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पुढील दीड महिन्यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नसल्याची भूमिका काही संस्थांनी घेतली आहे. तसेच मोफत टेस्ट सिरीज, डाऊट सोल्विंग सेशन्स आणि क्रॅश कोर्स सुरू करण्याची तयारीही करण्यात आली आहे.

RCC Coaching Class Latur : आरसीसी पुन्हा सुरू होणार का?

आरसीसी पुन्हा सुरू होईल का, त्यांचे शिक्षक विद्यार्थ्यांना उपलब्ध राहतील का आणि व्यवस्थापनावर पुढे आणखी कोणती कारवाई होईल का, याबाबत कोणतीही अधिकृत स्पष्टता नसल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. अनेक विद्यार्थी सध्या 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत असून पुढील निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत.

NEET Parents Concern : पालकांसमोर आर्थिक आणि मानसिक ताण

पालकांसमोरही मोठं आर्थिक आणि मानसिक संकट उभं राहिलं आहे. एका बाजूला आधीच कोचिंगसाठी झालेला मोठा खर्च, तर दुसऱ्या बाजूला नव्याने क्लास लावण्याची वेळ आल्याने अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांची चिंता वाढली आहे. अतिरिक्त खर्च परवडत नसल्याने काही पालकांनी मुलांना ऑनलाइन तयारीकडे वळवण्याचा निर्णय घेतला आहे.

Latur Education NEET : लातूरच्या शिक्षणविश्वासमोर मोठं आव्हान

लातूर हे राज्यातील स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाचे केंद्र मानलं जातं. अशा परिस्थितीत आरसीसीसारख्या मोठ्या संस्थेभोवती निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. पुढील काही दिवसांत प्रशासन, तपास यंत्रणा आणि संस्थेकडून येणाऱ्या निर्णयांवर हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अवलंबून आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Udayanidhi Stalin On Trisha Krishnan Thalapathy Vijay Relation: त्रिशा कृष्णनविषयी डबल मिनिंग वक्तव्य, तामिळनाडूचं राजकारण तापलं, उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात
त्रिशा कृष्णनविषयी डबल मिनिंग वक्तव्य, तामिळनाडूचं राजकारण तापलं, उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
तानाजी सावंत अन् मोटेंचं समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचं समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Embed widget