एक्स्प्लोर
जिल्हा बँका आणि पोस्ट ऑफिसमधील जुन्या नोटा RBI स्वीकारणार!
नवी दिल्ली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये पडून असलेल्या जुन्या 500, 1000 च्या नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वीकारणार आहे. अर्थ मंत्रायलाने याबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे.
8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या. त्यानंतर 10 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर या पाच दिवसात जिल्हा बँकांमध्ये, तर 30 डिसेंबर 2016 पर्यंत पोस्ट ऑफिस आणि अन्य बँकांमध्ये जमा करण्यात आलेल्या नोटा रिझर्व्ह बँकेच्या कोणत्याही कार्यालयात स्वीकारल्या जातील, असं अर्थमंत्रालयाने म्हटलं आहे.
नोटाबंदीनंतर जिल्हा बँकांमध्ये जुन्या नोटा स्वीकारण्यास पहिल्या पाच दिवसांनंतर बंदी घालण्यात आली. 10 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर या पाच दिवसातच जिल्हा बँकांमध्ये नोटा स्वीकारण्यात आल्या. मात्र नोटाबदली करुन देताना गैरप्रकार होत असल्याचं लक्षात आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास मनाई केली.
जिल्हा बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांची रक्कम पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज देणंही बँकांना कठिण झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकांसाठी हा निर्णय दिलासादायक मानता येईल.
रिझर्व्ह बँकेत जुन्या नोटा जमा केल्यानंतर नव्या स्वरुपातील रक्कम संबंधित बँकेच्या खात्यात जमा केली जाईल, असं अर्थमंत्रालयाने म्हटलं आहे. नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर पुढचे तीस दिवस ही रक्कम रिझर्व्ह बँकेत जमा करता येणार आहे
जिल्हा बँकांना दिलासा
नोटाबंदीनंतर देशातल्या 371 जिल्हा बँकांत चार दिवसात 44 हजार कोटींची रक्कम जमा झाली. एकट्या महाराष्ट्रात 31 जिल्हा बँकांत 4600 कोटी जमा झाले होते. यात जुन्या चलनातली रक्कम देशात 8 हजार कोटी तर राज्यात 2772 कोटी रूपये एवढी होती.
एकीकडे रद्द नोटा रिझर्व्ह बँक स्वीकारत नाही, दुसरीकडे ठेवीदारांना व्याज तर द्यावं लागतं, अशी बंकांची अडचण झाली होती. नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर पुढचे तीस दिवस ही रक्कम रिझर्व्ह बँकेत जमा करता येणार आहे.
केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतला. या नोटा बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये जमा करण्यासाठी 30 डिसेंबर 2016 पर्यंत मुदत देण्यात आली होती. ग्राहकांनी नोटा जमा केल्या असल्या तरी बँकांकडे नोटा पडून आहेत. त्यामुळे बँकांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement