एक्स्प्लोर

शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन देशाचा आर्थिक ताळेबंद बिघडवू नये: उर्जित पटेल

मुंबई: राज्य सरकारांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन देशाचा आर्थिक ताळेबंद बिघडवू नये, असा सल्ला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी दिला आहे. उत्तर प्रदेशनं केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी शिवाय महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये सुरु असलेल्या कर्जमाफीचा प्रयत्न, यामुळे चुकीचा पायंडा पडत असल्याचं परखड मत उर्जित पटेल यांनी व्यक्त केलं आहे. कर्जमाफी करणे म्हणजे इमानदारीने कर्ज फेडणाऱ्यांशी प्रतारणा असून, शेतकऱ्यांना कर्ज थकवण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रकार असल्याचं मतही त्यांनी मांडलं आहे. उत्तर प्रदेश सरकारनं आपल्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत 36 हजार कोटीहून अधिकचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं अशी मागणी केली जात आहे. अशा पद्धतीनं कर्जमाफी केल्यास याचे परिणाम भविष्यात भोगावे लागू शकतात असं मत उर्जित पटेल यांनी व्यक्त केलं आहे. उर्जित पटेल यांच्याआधी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांनीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध केला होता. “कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांकडून बँकांचे कर्ज फेडण्याच्या जबाबदारीवर चुकीचा परिणाम होतो. कर्जमाफीमुळे शेतकरी पुन्हा निवडणुकीची वाट पाहत राहतील आणि कर्जाची परतफेड करण्याऐवजी कर्ज माफ होण्याची वाट बघतील. सार्वजनिक क्षेत्रातील बँका जेव्हा डबघाईला येतात, तेव्हा त्या सरकारी मदतीची अपेक्षा करतात. मात्र, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनीही शेतकऱ्यांसारखंच सरकारी मदतीची अपेक्षा ठेवू नये आणि आपल्या ताकदीवरच सुधारणा करावी.” असं मत अरुंधती भट्टाचार्य यांनी व्यक्त केलं होतं. दरम्यान, रिझर्व्ह बँकेनं आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं. यावेळी रेपो रेटमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. रेपो रेट 6.25वर कायम ठेवण्यात आला. संबंधित बातम्या: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला एसबीआयच्या अध्यक्षांचा विरोध

महत्त्वाच्या बातम्या

Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
सरकार घाबरलंय, आंदोलन शक्तीशाली! 40 हजार निमलष्करी जवान तैनात करावे लागले, प्रशांत किशोरांचं मोठं वक्तव्य 
सरकार घाबरलंय, आंदोलन शक्तीशाली! 40 हजार निमलष्करी जवान तैनात करावे लागले, प्रशांत किशोरांचं मोठं वक्तव्य 

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

Embed widget