एक्स्प्लोर

Rashtrapati Bhavan : राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षायंत्रणेत मोठी त्रुटी , मुख्य गेटमधून दोघांचा प्रवेश

Rashtrapati Bhavan News : राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षायंत्रणेत मोठी त्रुटी असल्याचं समोर आलं आहे. दारुच्या नशेत दोघांनी मुख्य गेटमधून प्रवेश केला होता. 

Rashtrapati Bhavan Security Breach : राजधानी दिल्लीमध्ये असलेल्या राष्ट्रपती भवनाला कडेकोट सुरक्षा असते. पण या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. सोमवारी रात्री एक मुलगा आणि मुलीनं गाडीनं मुख्य गेटमधून राष्ट्रपती भवनात प्रवेश केला होता. सुरक्षारक्षकांनी त्यांना ताब्यात घेतलं. मात्र, गेटमधून सर्वसामान्यांना प्रवेश नसाताना त्यांनी कसा प्रवेश केला? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेनंतर सुरक्षा एजन्सी सतर्क झाल्या आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती भवनात प्रवेश करणारा मुलगा आणि मुलगी दारुच्या नशेत होते. या दोघांनी प्रवेश केल्यानंतर उपस्थित सुरक्षारक्षक सतर्क झाले होते. 

सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एका मुलानं मुख्य गेटमधून गाडी राष्ट्रपती भवनात नेली. त्यामुलासोबत गाडीमध्ये एक मुलगी होती. गेट क्रमांक 35 मधून या मुलानं गाडी राष्ट्रपती भवनात नेली. तीन बॅरिकेट्स पार करुन आतमध्ये पोहचली होती.त्यावेळी उपस्थित असणाऱ्या सुरक्षारक्षकांनी त्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दोघांनी ताब्यात घेतल्यानंतर चौकशी करण्यात आली. पोलिसांनी या दोघांना कोर्टात हजर केलं. न्यायालयानं या दोघांनी कोठडी सुनावली आहे. 

या दोघांनी राष्ट्रपती भवनात चुकून प्रवेश केला होता की जाणूनबूजून? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. पोलीस याबाबतचा तपास घेत आहेत. या प्रकरणानंतर राष्ट्रपती भवनाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाली आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं अंदोलन सुरु असल्यामुळे मोठी सुरक्षाव्यवस्था तैणात करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवन, शास्त्री भवन आणि पीएमओमध्ये प्रवेश करण्यावेळी कसून चौकशी आणि तपासणी केली जाते. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha 

संबधित बातम्या :

राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन सर्वसामान्यांसाठी खुलं
Coronavirus | राष्ट्रपती भवन परिसरात कोरोनाचा शिरकाव; 100 कुटुंब सेल्फ क्वॉरंन्टाईन
शिवरायांच्या प्रतिमेमुळे राष्ट्रपती भवनातील कमतरता पूर्ण : कोविंद

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff Car Firing Marathi News: अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?
अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
Rahul Gandhi: दिल्लीत पंतप्रधान, गृहमंत्र्यांना तत्काळ धडा शिकवू, सरकारची मुदत संपत आलीय, राहुल गांधीचा हल्लाबोल
दिल्लीत पंतप्रधान, गृहमंत्र्यांना तत्काळ धडा शिकवू, सरकारची मुदत संपत आलीय, राहुल गांधीचा हल्लाबोल

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत अरुण डोंगळेंसह महायुतीमधील तब्बल 6 दिग्गज पिछाडीवर असल्याने पोटात गोळा; तिसऱ्या फेरीत सतेज पाटलांच्या आघाडीची जोरदार मुसंडी
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत अरुण डोंगळेंसह महायुतीमधील तब्बल 6 दिग्गज पिछाडीवर असल्याने पोटात गोळा; तिसऱ्या फेरीत सतेज पाटलांच्या आघाडीची जोरदार मुसंडी
Tiger Shroff Car Firing Marathi News: अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?
अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?
Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफवर गोळी झाडणारा निघाला मुंबईतील रॅपिडो चालक, तीन हल्लेखोरांची नावं समोर, दोन कोवळी पोरं
टायगर श्रॉफवर गोळी झाडणारा निघाला मुंबईतील रॅपिडो चालक, तीन हल्लेखोरांची नावं समोर, दोन कोवळी पोरं
Chandrapur: 'आपण दोघेही 'वार', आपल्यापैकी एक मुख्यमंत्री झाला पाहिजे'; विजय वडेट्टीवार अन् सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबतचा मिश्किल संवाद, हस्तांदोलन करत सांगितली 'मन की बात'
'आपण दोघेही 'वार', आपल्यापैकी एक मुख्यमंत्री झाला पाहिजे'; विजय वडेट्टीवार अन् सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबतचा मिश्किल संवाद, हस्तांदोलन करत सांगितली 'मन की बात'
Gokul Election Result LIVE: सर्वसाधारण गटात 20 पैकी महायुतीचे 14 उमेदवार किरकोळ आघाडीवर, सतेज पाटलांच्या त्या 6 उमेदवारही आघाडीवर, माजी चेअरमन अरुण डोंगळे पिछाडीवर
Gokul Election Result LIVE: सर्वसाधारण गटात 20 पैकी महायुतीचे 14 उमेदवार किरकोळ आघाडीवर, सतेज पाटलांच्या त्या 6 उमेदवारही आघाडीवर, माजी चेअरमन अरुण डोंगळे पिछाडीवर
Sunetra Pawar: 'कोणाचीही गय केली जाणार नाही, हल्लेखोरांना तात्काळ अटक करा'; राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणी सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश
'कोणाचीही गय केली जाणार नाही, हल्लेखोरांना तात्काळ अटक करा'; राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणी सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश
Maharashtra Rain Update: कोकणासह राज्यात अवकाळी पावसाची हजेरी; हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह सतर्कतेचा इशारा, ‘यलो अलर्ट’ जारी
कोकणासह राज्यात अवकाळी पावसाची हजेरी; हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह सतर्कतेचा इशारा, ‘यलो अलर्ट’ जारी
Gokul Election Result LIVE: आमदार विनय कोरेंच्या बालेकिल्ल्यात सतेज पाटलांच्या आघाडीची मुसंडी! किती उमेदवार आघाडीवर? दुसऱ्या फेरीतही क्रॉस व्होटिंगचा धसका
Gokul Election Result LIVE: आमदार विनय कोरेंच्या बालेकिल्ल्यात सतेज पाटलांच्या आघाडीची मुसंडी! किती उमेदवार आघाडीवर? दुसऱ्या फेरीतही क्रॉस व्होटिंगचा धसका
Embed widget