Akasa Air : सामान्यांना परवडणाऱ्या अकासाच्या एअरलाईन्सच्या 'द रायझिंग ए' डिझाईनचे अनावरण; 'असं' असेल हे विमान
Akasa Air : राकेश झुनझुनवाला यांच्या मालकीच्या अकासा एअरलाईन्सच्या नवीन डिझाईनचे अनावरण करण्यात आलं आहे.
मुंबई : शेअर मार्केटमधील 'बिग बुल' अशी ओळख असणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांनी आता एव्हिएशन क्षेत्रात एन्ट्री केली आहे. पुढच्या वर्षी म्हणजे 2022 साली ही एअरलाईन्स कार्यान्वित होणार असून त्याच्या नव्या डिझाईनचे अनावरण करण्यात आलं आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात विमान प्रवास करता यावा यासाठी अकासा एअरलाईन्सची सुरुवात करण्यात येणार आहे.
बंगळुरु स्थित अकासा एअरने त्यांच्या विमानाचे डिझाईनचे अनावरण केलं आहे. अकासाने म्हटलं आहे की, "अकासा एअरचे ‘द रायझिंग ए’ अनावरण करत आहे. अवकाशापासून प्रेरित, द रायझिंग ए म्हणजे सूर्याची उबदारता, पक्ष्याप्रमाणे सहज उड्डाण आणि विमानाच्या पंखांच्या विश्वासार्हतेचे प्रतीक आहे"
Bengaluru-based Akasa Air unveils their new livery.
— ANI (@ANI) December 22, 2021
"Unveiling ‘The Rising A’ of Akasa Air. Inspired by elements of the sky, The Rising A symbolises the warmth of the sun, the effortless flight of a bird, and the dependability of an aircraft wing," they tweet. pic.twitter.com/rsVRTc7U5F
हवाई वाहतूक मंत्रालयाने राकेश झुनझुनवाला यांच्या 'अकासा एअर' या एअरलाईन्सला ना हरकत प्रमाणपत्रक दिलं आहे. ही नवीन एअरलाईन्स 2022 पर्यंत सुरु करण्याचं लक्ष असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. आकाश एअर मध्ये राकेश झुनझुनवाला आणि जेट एअरवेजचे माजी सीईओ विनय दुबे यांची भागिदारी आहे.
शेअर मार्केटमधील 'बिग बुल' अशी ओळख असणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांनी आता एव्हिएशन क्षेत्रात एन्ट्री केली आहे. भारतामध्ये येत्या काळात लो कॉस्ट विमानसेवा सुरु करण्यासाठी ते 3.5 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार असून त्याचाच एक भाग म्हणून येत्या चार वर्षात 70 विमाने खरेदी करण्याची योजना तयार केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Akasa Airlines : राकेश झुनझुनवालांच्या 'अकासा एअर'ला हवाई वाहतूक मंत्रालयाची NOC, पुढच्या वर्षी सेवा सुरु होण्याची शक्यता
- Tata Acquired Air India : एअर इंडियाची मालकी पुन्हा एकदा टाटांकडे; 68 वर्षांनी सांभाळणार जबाबदारी
- Air India : 'वेलकम बॅक, एअर इंडिया...', मालकी मिळाल्यानंतर रतन टाटाची भावनिक प्रतिक्रिया