एक्स्प्लोर
गिनीज बुकातील मोदींच्या सुटावर राहुल गांधींचा निशाणा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महागड्या सुटाची नोंद गिनीज बुकमध्ये झाल्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी मात्र त्यावर निशाणा साधला आहे. 'मोदींच्या त्यागापुढे ही बाब काहीच नाही' असं ट्वीट राहुल यांनी केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट मिळालेल्या सुटाला लिलावात आलेली किंमत गिनीज बुकात नोंद झाली आहे. यासंदर्भातील एक बातमी ट्वीट करत राहुल गांधींनी टीका केली. यापूर्वीही राहुल गांधींनी मोदींवर 'सुटा-बुटाचं सरकार' असं म्हणत टीका केली होती.
https://twitter.com/OfficeOfRG/status/767209588676501504
सुरतचे व्यापारी लानजीभाई पटेल यांनी मोदींना हा सूट भेट म्हणून दिला होता. लिलावात या सुटाला तब्बल 4 कोटी 31 लाख 31 हजार 311 रुपयांची किंमत मिळाली होती. आतापर्यंत कोणत्याही सुटाला मिळालेली ही सर्वाधिक रकक्म आहे.
या सुटावर नरेंद्र दामोदरदास मोदी असं पूर्ण नाव कोरण्यात आलं होतं. यावरुन पंतप्रधान मोदींवर अनेक स्तरातून टीकाही झाली होती. त्यामुळे या सुटाचा लिलाव करण्याचा निर्णय मोदींनी घेतला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement