Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) लडाखच्या दौऱ्यावर (Ladakh) आहेत. शनिवारी (19 ऑगस्ट) ते पँगॉन्ग लेकवर (Pangong Lake) गेले होते, तिथे त्यांनी बाईकही चालवली. राहुल गांधींचे बाईकवरील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सर्व फोटोमध्ये राहुल गांधींचा बाईक चालवतानाचा हटके स्वॅग दिसत आहेत, त्यांनी प्रॉपर जॅकेट वैगरे असा स्पोर्ट्स सूट आणि शूजही घातले आहेत. लडाख दौऱ्यावर (Ladakh Tour) असताना राहुल गांधींनी त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची देखील आठवण काढली आहे. यावेळी ते म्हणाले, पँगॉन्ग लेक हे जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक असल्याचं वडील म्हणायचे.


पँगॉन्ग लेकवर साजरा करणार वडिलांचा वाढदिवस


खरं तर, राहुल गांधींचा लडाख दौरा हा केवळ दोन दिवसांचा होता. केवळ 17 आणि 18 ऑगस्टला ते लडाख दौऱ्यावर होते. परंतु त्यांनी हा दौरा आठ दिवसांनी वाढवला आहे. राहुल गांधींनी लडाख ते पँगॉन्ग लेकपर्यंत बाईक राईड केली आहे. राहुल गांधींच्या वडिलांची, म्हणजेच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 20 ऑगस्ट रोजी जयंती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी वडिलांचा वाढदिवस पँगॉन्ग लेकवर साजरा करणार आहेत.


लडाखच्या रस्त्यावर स्मार्ट बाईक रायडर


कलम 370 आणि 35 (अ) रद्द केल्यानंतर, जम्मू-काश्मीरपासून लेह-लडाख वेगळं झाल्यानंतर आणि नवीन केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झाल्यानंतर राहुल गांधी यांचा हा पहिला लडाख दौरा आहे. यावेळी राहुल गांधी लडाखच्या रस्त्यांवर KTM बाईकवर स्पोर्ट्स हेल्मेट घालून दिसले. दरम्यान, लडाखच्या मुक्कामादरम्यान राहुल गांधी कारगिल स्मारकावर गेले होते. यावेळी त्यांनी स्थानिक तरुणांशी देखील संवाद साधला.


बाईक चालवण्याची राहुल गांधींना आवड


राहुल गांधी यांना बाईक चालवण्याची आवड आहे, याबाबत त्यांनी स्वतः सांगितलं आहे. राहुल गांधींनी नुकतंच दिल्लीतील करोल बाग भागात मोटर मेकॅनिकशी संवाद साधला होता. या दरम्यान एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितलं की, त्यांना बाईक चालवायला खूप आवडते. राहुल गांधी म्हणाले होते की त्यांच्याकडे केटीएम बाईक आहे, पण ती तशीच पडून आहे आणि सुरक्षेमुळे त्यांना चालवता येत नाही.


राहुल गांधींचा दौरा 25 ऑगस्टपर्यंत वाढला


लडाखमध्ये राहुल गांधींनी एका कार्यक्रमातही सहभाग घेतला,यासोबत राहुल गांधींनी लेहमध्ये फुटबॉलचा सामनाही पाहिला. कॉलेजच्या काळात राहुल गांधी हे उत्तम फुटबॉलपटू राहिले आहेत. राहुल गांधी केवळ दोन दिवसांसाठी लडाख दौऱ्यांवर आले होते, पण आता त्यांनी आपला प्लॅन बदलला आहे आणि दौरा वाढवला आहे. आता 25 ऑगस्टपर्यंत राहुल गांधींनी केंद्रशासित प्रदेशात राहण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी गुरुवारी लडाखला पोहोचले, तिथे लेह विमानतळावर पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं.


कारगिल स्वायत्त विकास परिषदेची 10 सप्टेंबरला निवडणूक


कारगिल निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ते 30 सदस्यीय लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल आणि काँग्रेसच्या बैठकीतही उपस्थित राहणार आहेत. कारगिल परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने भारतीय जनता पक्षाच्या (BJP) विरोधात आघाडी केली आहे. 10 सप्टेंबरला ही निवडणूक होत आहे.


हेही वाचा: