(Source: ECI/ABP News/ABP Majha)
2024 मध्ये राहुल गांधी पंतप्रधानपदाचा चेहरा, कमलनाथ यांचा विश्वास
Rahul Gandhi: 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी पंतप्रधानपदाचा चेहरा असतील, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी व्यक्त केला आहे.
Rahul Gandhi: 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी पंतप्रधानपदाचा चेहरा असतील, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी व्यक्त केला आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपलं मत व्यक्त केलेय. ते म्हणाले की, 2004 साठी राहुल गांधी विरोधी पक्षांचाच नाही तर पंतप्रधानपदाचा चेहरा असतील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी असा आशावाद व्यक्त केला आहे. राहुल गांधी सत्तेसाठी नाही तर जनतेसाठी राजकारण करतात त्यामुळे जनताच त्यांना सिंहासनावर बसवेल.
आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी विरोधी पक्षाचा चेहरा असतील का? यावर बोलताना कमलनाथ म्हणाले की, ‘‘ 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी विरोधी पक्षाचा चेहरा नव्हे तर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असतील. ते राजकारण करत नाहीत, ते समाजकारण करतात. त्यामुळे जनता त्यांना पंतप्रधानपदाच्या सिंहालनावर बसवेल.’’
कमलनाथ यांच्या मते, ' जगभरात 3500 किमी पेक्षा जास्त पायी यात्रा कोणत्याही व्यक्तीने केली नसेल. भारत देशासाठी जेवढे हौतात्म्य गांधी घराण्याने दिले आहे, तेवढे कोणत्याही कुटुंबाने दिलेले नाही.' राहुल गांधी सत्तेसाठी नाही तर जनतेसाठी राजकारण करतात. जो जनतेसाठी राजकारण करतो, त्याला जनता स्वत:त पंतप्रधानांच्या सिंहासनावर बसवेल.'
गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसच्या दिग्गज नेत्यानं पहिल्यांदाच राहुल गांधी पंतप्रधानपदाचा चेहरा असतील असं म्हटले आहे. त्यामुळेच कमलनाथ यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
मध्य प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष 76 वर्षीय कमलनाथ म्हणाले की, ' जेव्हा ‘भारत जोडो यात्रा’ तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या दक्षिण भारताच्या राज्यातून गेली, तेव्हा भाजपने भारत जोडो यात्रा अपयशी ठरल्याचा चुकीचा प्रचार केला. महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला, तेव्हा दक्षिण भारतामध्ये जसा प्रतिसाद मिळाला तसा मिळाला नसल्याचं वारंवार म्हटले गेलेय. मध्य प्रदेशमध्ये भारत जोडो यात्राने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.' राज्यस्थान आणि दिल्लीमध्येही भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद मिळालाय, असेही कमलनाथ म्हणाले.
भारत जोडो यात्रेत काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत सर्वसामान्य नागरिकही सामिल झाले होते. खासकरुन या यात्रेत तरुणांची संख्या मोठी होती, असं कमलनाथ यांनी सांगितलं.