एक्स्प्लोर

काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर, दिग्गजांची सुट्टी

CWC मध्ये 23 सदस्य, 18 स्थायी आमंत्रित सदस्य आणि 10 आमंत्रित सदस्यांचा समावेश आहे. राहुल गांधींनी 22 जुलै रोजी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाची नवी कार्यकारिणी (CWC) जाहीर केली आहे. ज्यामध्ये अनेक अनुभवी आणि युवा नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर दिग्गज नेत्यांना सुट्टी दिली आहे. CWC मध्ये 23 सदस्य, 18 स्थायी आमंत्रित सदस्य आणि 10 आमंत्रित सदस्यांचा समावेश आहे. राहुल गांधींनी 22 जुलै रोजी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. विशेष म्हणजे दिग्विजय सिंह, जनार्दन द्विवेदी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचा या कार्यकारिणीत समावेश करण्यात आलेला नाही. तर मनमोहन सिंह, सोनिया गांधी, गुलाम नबी आझाद यांना कार्यकारिणीत कायम ठेवण्यात आलं आहे. सर्व स्वतंत्र प्रभारी आणि काँग्रेसच्या मुख्य संघटनांचे प्रमुखही या कार्यकारिणीचे सदस्य असतील. काँग्रेस कार्यकारिणी निर्णय घेणारी सर्वात मोठी समिती आहे. याच वर्षी मार्चमध्ये काँग्रेसच्या महाअधिवेशनात एकमताने प्रस्ताव मंजूर करुन कार्यकारिणीच्या निवडीची जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर सोपवण्यात आली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतली. स्थायी आमंत्रित सदस्यांमध्ये राज्यातील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, खासदार राजीव सातव आणि रजनी पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. कार्यकारिणीत कुणाकुणाचा समावेश? 23 सदस्यीय कार्यकारिणीत राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंह, मोतीलाल वोहरा, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, एके अँटोनी, अहमद पटेल, अंबिका सोनी, ओमान चांडी, तरण गोगोई, सिद्धरमैया, आनंद शर्मा, हरीश रावत, कुमारी शैलजा, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, केसी वेणुगोपाल, दीपक बाबरिया, तमराध्वाज साहू, रघुबीर मीणा, गाईखमगम आणि अशोक गहलोत यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय स्थायी आमंत्रित सदस्यांमध्ये शीला दीक्षित. पी. चिदंबरम, ज्योतिरादित्य सिंधिया, बाळासाहेब थोरात, तारिक हमीद कारा, पीसी चाको, जितेंद्र सिंह, आरपीएन सिंह, पीएल पुनिया, रणदीप सुरजेवाला, आशा कुमारी, रजनी पाटील, रामचंद्र खुंतिया, अनुग्रह नारायण सिंह, राजीव सातव, शक्ती सिंह गोहिल, गौरव गोगोई आणि डॉ. ए चेलाकुमार यांच्या नावाचा समावेश आहे. विशेष आमंत्रित सदस्यांमध्ये केएच मनुयप्पा, अरुण यादव, दीपेंद्र हुड्डा, जीतीन प्रसाद, कुलदीप विश्नोई, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसचे अध्यक्ष, इंडियन यूथ काँग्रेसचे अध्यक्ष, नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाचे अध्यक्ष, ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आणि काँग्रेस सेवा दल प्रमुखांचा यामध्ये समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maitreya Dadashree: 'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
RSS on Ram Mandir: राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
Raja Raghuvanshi Case: सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?
सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Share Market : शेअर बाजारात तेजीचं अमेरिका कनेक्शन, सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांनी 94 हजार कोटी कमावले
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 262 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 94270 कोटींची कमाई
Embed widget