एक्स्प्लोर
मोदींना 36 वर्षांपासून राखी बांधणारी पाकिस्तानी बहिण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाकिस्तानी बहिण कमर मोहसिन शेख यावर्षीही त्यांना राखी बांधणार आहे. लग्नानंतर कमर मोहसिन शेख भारतात स्थायिक झाल्या. तेव्हापासून त्या इथेच राहतात.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाकिस्तानी बहिण कमर मोहसिन शेख यावर्षीही त्यांना राखी बांधणार आहे. लग्नानंतर कमर मोहसिन शेख भारतात स्थायिक झाल्या. तेव्हापासून त्या इथेच राहतात.
मोदींना पहिल्यांदा राखी बांधली तेव्हा ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. मात्र आज त्यांच्या मेहनतीच्या बळावर ते देशाचे पंतप्रधान आहेत, असं कमर मोहसिन शेख म्हणाल्या.
https://twitter.com/ANI_news/status/894220399679909888
https://twitter.com/ANI_news/status/894220755067482112
https://twitter.com/ANI_news/status/894224166873833472
या रक्षाबंधनाला मोदी व्यस्त असतील, असं वाटलं होतं. मात्र दोन दिवसांपूर्वीच त्यांचा फोन आला. त्यामुळे मी राखी बांधण्यासाठी उत्सुक आहे. त्याची तयारीही सुरु केली आहे, असं कमर मोहसिन शेख यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं.
भारतात आल्यानंतर सासरच्यांशिवाय इथे कोणीही नव्हतं. पतीसोबत दिल्लीत आल्यानंतर मोदींशी ओळख झाली. ते नेहमी बहिण म्हणूनच बोलायचे. त्यांना गेल्या 36 वर्षांपासून राखी बांधते, यावर्षीही त्यांना राखी बांधण्यासाठी बोलावलं आहे, असंही कमर मोहसिन शेख म्हणाल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
बातम्या
महाराष्ट्र
Advertisement