(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Punjab Election : 'आप'ला पंजाब निवडणुकीच्या विजयाचा बोनस; राज्यसभेत वाढणार ताकद
Punjab Assembly Election AAP : पंजाबमधील विजयाचा मोठा फायदा आम आदमी पक्षाला होणार आहे. पंजाबमधील राज्यसभा खासदार निवडणुकीसाठी
Punjab Assembly Election AAP : पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवला. आम आदमी पक्षाने तब्बल 92 जागांवर विजय मिळवला. पंजाबमधील या दमदार विजयाचा बोनस आप आला मिळणार आहे. पंजाबमधील या एकतर्फी विजयामुळे आपचे राज्यसभेतील खासदारांची संख्या वाढणार आहे. विशेष म्हणजे या महिन्याच्या अखेरीस पंजाबमधील राज्यसभेच्या पाच खासदारांसाठी निवडणूक होणार आहे. 'आप'ला या पाच जागांवर आपले उमेदवार सहजपणे विजयी करता येणार आहे.
'आप'ने पंजाब निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेससह अकाली दल आणि भाजपला धोबीपछाड दिला. विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, उपमुख्यमंत्री, पंजाब काँग्रेस अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू अशा दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्याशिवाय कॅप्टन अमरिंदर आणि सुखबीर सिंह बादल यांचाही पराभव झाला. पंजाबमधील या निवडणूक विजयाचा आम आदमी पक्षाला राज्यसभेतही मोठा फायदा होणार आहे. येत्या 31 मार्च रोजी पंजाबमधून राज्यसभेच्या खासदारांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. 'आप'कडे असलेले बहुमत पाहता ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. राज्यसभेत एकूण सात जागा पंजाबमधून निवडल्या जातात. त्यातील पाच जागांसाठी 31 मार्च रोजी निवडणूक होणार आहे.
राज्यसभेत बळ वाढणार
सध्या राज्यसभेत आपचे तीन खासदार आहेत. पंजाबमधील 5 खासदारांची निवड झाल्यानंतर ही संख्या आठ होणार आहे. राज्यसभेत 'आप'चे बळ वाढणार आहे.
भाजपलाही मोठा फायदा
भारतीय जनता पक्ष राज्यसभेत प्रथमच 100 जागांचा आकडा पार करणार आहे. या वर्षाच्या अखेरीस भाजपचे राज्यसभेतील बळ सध्याच्या 97 जागांवरून 104 जागांवर जाणार आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 243 जागा असलेल्या राज्यसभेत 122 पर्यंतचे संख्याबळ होणार आहे. त्यामुळे राज्यसभेतही भाजपकडे बहुमत असणार आहे. भाजप उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या तीन जागांवर विजयी होईल. त्याशिवाय, आसाम, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधून काँग्रेसकडून चार जागा मिळतील. या राज्यांमध्ये विधानसभेतील काँग्रेस आमदारांची संख्या कमी झाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Election Result 2022: सर्व मतदारसंघाचे अंतिम निकाल जाहीर, पाहा एका क्लिकवर कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा?
- भगवंत मान यांनी सिद्धूंना समजवला 'राजकारणाचा अर्थ', जुना व्हिडीओ व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha