नवी दिल्ली : लष्कराच्या युनिफॉर्मचं आकर्षण कुणाला नसतं. लष्करी सेवेत एक शिस्तबद्धता, निरोगी आयुष्य या भारतीय लष्कराच्या गुणांचा फायदा तरुणाईला करुन देण्यासाठी एक अनोखा प्रस्ताव सध्या विचाराधीन आहे. भारतीय लष्करामध्ये सध्या एका शॉर्ट टर्म भरतीच्या अनोख्या प्रस्तावाची चर्चा सुरु आहे. भारतीय लष्करात सामान्यांची तीन वर्षांसाठी भरती करण्याचा विचार सुरु आहे. टूर ऑफ दी ड्युटी अर्थात लष्कराची ओळख या नावानं ही योजना राबवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.


सध्या लष्करावर वेतन आणि पेन्शन याचा प्रचंड भार आहे. लष्कराच्या एकूण बजेटमधला जवळपास 50 टक्के भाग यावरच खर्च होतो. त्यामुळे लष्कराच्या आधुनिकीकरकणासाठी पैसा शिल्लकच राहत नाही. त्यामुळेच लष्कराबद्दल, युनिफॉर्म बद्दल असलेलं तरुणाईचं आकर्षण सकारात्मक पद्धतीनं वापरण्याचा हेतू यामागे आहे.


अल्पकाळ भरतीचे फायदे


जे लोक 3 वर्षे ट्रेनिंग घेतील, त्यांना या काळात लष्कराकडून पूर्ण वेतन मिळेल. पण नंतर माजी सैनिक म्हणून त्यांना कुठलेही पेन्शन भत्ते मिळणार नाहीत. सध्याच्या शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये भरती झालेल्या एका अधिकाऱ्यावर सेवेत आणि निवृत्तीनंतर होणारा खर्च हा साधारण 14 कोटी रुपये इतका आहे. या सेवेअंतर्गत मात्र तीन वर्षात अधिकाऱ्यावर 80-85 लाख इतकाच खर्च ट्रेनिंग आणि वेतनावर होईल. लष्कराची 3 वर्षांची सेवा पूर्ण करुन हे तरुण नंतर इतर करिअरमधेही संधी शोधू शकतात. लष्करी ट्रेनिंग पूर्ण करुन आल्यानं त्यांचा अनेक ठिकाणी प्राधान्यानं विचारही होऊ शकतो.


या प्रस्तावाचं स्वागत अनेक माजी लष्करी अधिकाऱ्यांनीही केलं आहे.निवृत्ती वेतन किंवा इतर कुठल्या जबाबदारी तीन वर्षानंतर सरकारवर राहणार नाहीत. पण अशा सेवेसाठी प्रोत्साहन म्हणून सरकार या लोकांना काही इतर सवलती जाहीर करु शकतं. त्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये, काही इतर नोकऱ्यांमध्येही राखीव कोटा ठेऊ शकतं. लष्करात अधिकारी आणि जवान या दोन्ही पातळ्यांवर हा प्रयोग करण्याचा सरकारचा विचार आहे. अर्थात या भरतीसाठीची प्रक्रिया मात्र इतर जवानांइतकीच कडक असणार आहे.


Indian Army Short Service | भारतीय लष्करात पहिल्यांदाच तीन वर्षांच्या शॉर्ट सर्व्हिसचा प्रस्ताव



ABP EXCLUSIVE | दहशतवाद वाढविण्यासाठी पाकिस्तान जबाबदार, यामध्ये दुमत नाहीच : लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे