एक्स्प्लोर

काँग्रेसची मोठी खेळी, प्रियांका गांधींवर सरचिटणीसपदाची जबाबदारी

प्रियांका गांधी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कार्यभार स्वीकारणार आहेत.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने मोठा बदल केला आहे. प्रियांका गांधी यांनी राजकारणात अधिकृत प्रवेश केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आज प्रियांका गांधींची काँग्रेस सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली. तसंच प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पूर्वची जबाबदारी देण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेश पश्चिमचं नेतृत्त्व ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. प्रियांका गांधी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कार्यभार स्वीकारणार आहेत. या निर्णयामुळे इतके दिवस पडद्यामागे काम करणाऱ्या प्रियांका गांधी यांना पहिल्यांदाच संघटनेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत. तसंच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींची यावेळी निवडणूक लढण्याची शक्यता कमी असल्याने प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का अशीही चर्चा रंगू लागली आहे मागील अनेक वर्षांपासून प्रियांका गांधींनी राजकारणात प्रवेश करावा, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्ते करत होते. ती मागणी आज पूर्ण झाली आहे. प्रियांका गांधी आतापर्यंत रायबरेली आणि अमेठी या मतदारसंघातच मर्यादित होत्या. त्या केवळ आई सोनिया गांधी आणि भाऊ राहुल गांधी यांच्या प्रचारात दिसत होत्या. मात्र आता त्या अधिकृतरित्या पक्षात सक्रीय होणार आहेत. 2019 ची लोकसभा निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे आणि त्यात उत्तर प्रदेशची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. उत्तर प्रदेशात सपा आणि बसपाने एकत्र येत, काँग्रेसला आघाडीतून बाहेर ठेवल्याने सगळं समीकरण बदललं आहे. यानंतर राहुल गांधींनी दावा केला होता की, "जनता आता काँग्रेसला फार मनावर घेत नाही, पण 2019 ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देईल." राज्यातील सर्व 80 लोकसभा जागांवर स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काँग्रेसने केली होती. काँग्रेस उत्तर प्रदेशात पूर्ण जोर लावून निवडणूक लढवणार आहे. प्रियांका पक्षात आल्याचा परिणाम संपूर्ण उत्तर प्रदेशात दिसेल. प्रियांका गांधींना उत्तर प्रदेश पूर्व जबाबदारी दिली असली तरी त्याचा परिणाम पूर्ण यूपीवर पडेल, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget