एक्स्प्लोर
लाल किल्ल्यावरील भाषणासाठी मोदींना 4 हजारपेक्षा जास्त सूचना
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरील भाषणासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शानदार कल्पना दिली आहे. ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाला सन्मान देण्यासाठी संघर्ष करत असलेल्या खेळाडूंचं नाव भाषणात घ्या, असा सल्ला सचिनने दिला आहे.
पंतप्रधानांनी बोललेले शब्द ऑलिम्पिकमधील खेळांडूंसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतील, असं मत सचिनने व्यक्त केलं आहे. मोदींनी 'नमो' या मोबाईल अॅपच्या माध्यमातून स्वातंत्र्यादिनानिमित्त केल्या जाणाऱ्या लाल किल्ल्यावरील भाषणात कोणत्या मुद्द्यांचा समावेश असावा, यासाठी सूचना मागवल्या होत्या. सचिननेही आपलं मत व्यक्त केलं आहे.
मोदींना आलेल्या प्रमुख सूचना
- सचिन तेंडुलकरः ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाला सन्मान देण्यासाठी संघर्ष करत असलेल्या खेळाडूंचं नाव भाषणात घ्यावं. यामुळे खेळाडूंना प्रेरणा मिळेल.
- पंतप्रधानांनी लोकांना क्रिकेट सोडता इतर खेळांकडेही लक्ष देण्याचं आवाहन करावं, ज्यामुळे पुढील ऑलिम्पिकपर्यंत भारताला पदक मिळवून देण्यासाठी काही शिलेदार तयार होतील.
- वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन करावं. दिल्ली, मुंबईसारख्या शहरांमध्ये वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे.
- पंतप्रधानांनी सध्याच्या प्रमुख योजनांवर भाष्य करावं, ज्यांची डेडलाईन 2016 आहे. नवी मुंबई विमानतळाचा मुद्दाही भाषणात घ्यावा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement