एक्स्प्लोर

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मध्य प्रदेश दौऱ्यावर, विविध प्रकल्पांचा शुभारंभ करणार; कोटा-बिना रेल्वे मार्गाचे उद्घाटन होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे उद्या ( 12 ऑगस्ट 2023) रोजी मध्य प्रदेशचा (Madhya Pradesh) दौरा करणार आहेत.

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे उद्या ( 12 ऑगस्ट 2023) रोजी मध्य प्रदेशचा (Madhya Pradesh) दौरा करणार आहेत. त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन होणार आहे. तसेच त्यांच्या हस्ते संत शिरोमणी गुरुदेव श्री रविदास जी स्मारकाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. ते दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी सागर जिल्ह्यात पोहोचतील. त्यानंतर दुपारी 3:15 च्या सुमारास ढाना येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. 

11.25 एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर श्री रविदासजी यांचे स्मारक

संत शिरोमणी गुरुदेव श्री रविदासजी यांचे स्मारक 11.25 एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर आणि 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून आकाराला येणार आहे. या भव्य स्मारकामध्ये संत शिरोमणी गुरुदेव श्री रविदास जी यांचे जीवन, तत्वज्ञान आणि शिकवण यांचे दर्शन घडवणारे एक प्रभावी कला संग्रहालय आणि दालन असणार आहे. स्मारकाला भेट देणाऱ्या भाविकांसाठी यात भक्त निवास, भोजनालय आदी सुविधा देण्यात येणार आहेत.

4000 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार

पंतप्रधान कार्यक्रमादरम्यान, 4000 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या रेल्वे आणि रस्ते क्षेत्रातील प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. कोटा-बिना रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले असून, हा प्रकल्प पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील. हा प्रकल्प अंदाजे 2 हजार 475 कोटींहून अधिक खर्चातून उभारला आहे. हा राजस्थानमधील कोटा आणि बारन आणि मध्य प्रदेशातील गुना, अशोकनगर आणि सागर जिल्ह्यातून जातो. अतिरिक्त रेल्वे मार्गामुळे चांगल्या वाहतुकीची क्षमता वाढेल आणि मार्गावरील रेल्वेगाड्यांचा वेग सुधारण्यासही मदत होईल.

1 हजार 580 कोटींहून अधिक खर्चाच्या दोन रस्ते प्रकल्पांची पायाभरणी करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 हजार 580 कोटींहून अधिक खर्चाच्या दोन रस्ते प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत.  यामध्ये मोरीकोरी - विदिशा - हिनोतिया यांना जोडणारा चौपदरी रस्ता प्रकल्प आणि हिनोतिया ते मेहलुवा यांना जोडणारा रस्ता प्रकल्प यांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

PM Modi On Rahul Gandhi : 'जशी अहंकाराने लंका जाळली होती तशीच त्यांची स्थिती झाली आहे', लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राहुल गांधींवर घणाघात

 

महत्त्वाच्या बातम्या

Adulteration In Gold Marathi News: सोन्यात भेसळ, 22 कॅरेटच्या नावाखाली 20 कॅरेटचे सोने; हादरवणारा प्रकार; सोनं विकत घेताना काय करायचं?, A टू Z माहिती
सोन्यात भेसळ, 22 कॅरेटच्या नावाखाली 20 कॅरेटचे सोने; हादरवणारा प्रकार; सोनं विकत घेताना काय करायचं?, A टू Z माहिती
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Bangladesh Crisis : बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचा वणवा, बॉम्बस्फोट अन् जाळपोळ; पंतप्रधान तारिक रहमान यांचे भारताकडे बोट, मोठा आरोप
बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचा वणवा, बॉम्बस्फोट अन् जाळपोळ; पंतप्रधान तारिक रहमान यांचे भारताकडे बोट, मोठा आरोप
धक्कादायक! दारुमुळं अनेक कुटुंबं उद्ध्वस्त, मणिपूरमध्ये आत्तापर्यंत 15 जणांचा मृत्यू तर 181 जणावर उपचार सुरु 
धक्कादायक! दारुमुळं अनेक कुटुंबं उद्ध्वस्त, मणिपूरमध्ये आत्तापर्यंत 15 जणांचा मृत्यू तर 181 जणावर उपचार सुरु 

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sinhgad Education Society Case : सिंहगड एज्युकेशन सोसायटी प्रकरणात निधी वळवण्यात सरकारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा संशय, 44 संस्थांच्या चौकशीचे आदेश
सिंहगड एज्युकेशन सोसायटी प्रकरणात निधी वळवण्यात सरकारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा संशय, 44 संस्थांच्या चौकशीचे आदेश
Deepali Sayyad : चित्रपटात रूपाली नाही तर...; दिपाली सय्यद यांनी सांगितलं पात्राचं नाव, म्हणाल्या चित्रपट रिलीज होऊ नये यासाठी अडचणी आणल्या जातायत, चाकणकरांचं नाव घेत आंदोलनाचाही दिला इशारा
चित्रपटात रूपाली नाही तर...; दिपाली सय्यद यांनी सांगितलं पात्राचं नाव, म्हणाल्या चित्रपट रिलीज होऊ नये यासाठी अडचणी आणल्या जातायत, चाकणकरांचं नाव घेत आंदोलनाचाही दिला इशारा
Mumbai Railway News: मांडवी एक्सप्रेस विक्रोळी स्टेशनवर अडकली, मध्यरेल्वेचं वेळापत्रक खोळंबलं; लोकल गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम
मांडवी एक्सप्रेस विक्रोळी स्टेशनवर अडकली, मध्यरेल्वेचं वेळापत्रक खोळंबलं; लोकल गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम
Kartiki Ekadashi Pandharpur 2026: रामकृष्ण हरी...विठ्ठल विठ्ठल! कार्तिकी एकादशीनिमित्त एकनाथ शिंदेंकडून विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक पूजा, Photo
रामकृष्ण हरी...विठ्ठल विठ्ठल! कार्तिकी एकादशीनिमित्त एकनाथ शिंदेंकडून विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक पूजा, Photo
Eknath Shinde Speech Kartiki Ekadashi Pandharpur 2026: सरकार आणि शिवसेना शेतकऱ्यांसोबत, कोणतंही वेडंवाकडं पाऊल उचलू नका; एकनाथ शिंदेंचं पंढरपुरातून आवाहन
सरकार आणि शिवसेना शेतकऱ्यांसोबत, कोणतंही वेडंवाकडं पाऊल उचलू नका; एकनाथ शिंदेंचं पंढरपुरातून आवाहन
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Embed widget