एक्स्प्लोर

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील सिरम इन्स्टीट्यूटला भेट देण्याची शक्यता; सुमारे 100 देशातील राजदूतांची पुण्याला भेट निश्चित

हिंजवडी मधील लस निर्मीतीशी संबंधित जिनोव्हा बायोफार्माक्युटिक्लस लिमिटेड कंपनीत ते भेट देणार आहे. त्यानंतर ते लोहगाव विमानतळावर दाखल होऊन दिल्लीस रवाना होतील.

पुणे : ऑक्सफर्ड विद्यापीठ व अस्ट्राझेनका कंपनीसोबत पुण्यातील सिरम इन्सिटटयूटने लस निर्मितीचा करार केलेला असून ‘कोवीशिल्ड’ लस निर्मितीच्या अंतिम टप्प्यात आहे. याबाबतची माहिती जाणून घेण्याकरिता पतंप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबर रोजी सिरमला भेट देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोरोना लसीची माहिती घेऊन लस वितरणाचे तयारीचा आढावा ते घेतील.

कोविशिल्ड लसीचे उत्पादन सीरममध्ये होऊन ते जगभरात वितरित केली जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासह दिल्लीतील सुमारे 100 देशांचे राजदूत सिरमला 4 आणि 5 डिसेंबर रोजी भेट देऊन यासंदर्भातील माहिती घेणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र, पंतप्रधान यांचे दौऱ्याबाबत अद्याप पंतप्रधान कार्यालय किंवा प्रशासकीय अधिकारी यांनी अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु परराष्ट्र मंत्रालयाने यासंर्दभात पुणे पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी संर्पक करुन आवश्यक ती माहिती घेतलेली आहे.

कोविशिल्ड लसीचे उत्पादन नेमके कसे सुरु आहे, कशाप्रकारे लस निर्माण करण्यात आली. चाचण्यांचे अहवालाचे निष्कर्ष, लसीचे वितरण, लसीची किंमत यासंर्दभात सविस्तर माहिती घेऊन या दौऱ्यात चर्चा केली जाणार आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे डेप्युटी चीफ ऑफ प्रोटोकॉल सर्वजीत सूदन यांनी राजदूतांचे अधिकृत दौऱ्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व महाराष्ट्र राज्याचे सहसचिव (प्रोटोकॉल) यांना पत्राद्वारे कळवलेली आहे.

सुरुवातीला सदर राजदूतांचे शिष्टमंडळ 27 नोव्हेंबर रोजी सिरमला भेट देणार हाेते परंतु त्यात बदल करुन संबंधित दौरा 4 व 5 डिसेंबर रोजी ठरविण्यात आलेला आहे. चार डिसेंबर राजी दिल्लीतून विशेष विमानाने राजदूतांचे शिष्टमंडळ पुण्यातील विमानतळावर आगमन करतील. त्यानंतर हडपसर परिसरातील सिरम संस्थेला ते भेट देणार आहे. त्यानंतर हिंजवडी मधील लस निर्मीतीशी संबंधित जिनोव्हा बायोफार्माक्युटिक्लस लिमिटेड कंपनीत ते भेट देणार आहे. त्यानंतर ते लोहगाव विमानतळावर दाखल होऊन दिल्लीस रवाना होतील. अशा प्रकारे पाच नोव्हेंबर राजदूतांचे शिष्टमंडळाचे दुसरे पथक पुण्यात भेटीस येऊन पुन्हा दिल्लीस परतणार आहे. यादरम्यान कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुणे विमानतळ व शिष्टमंडळाचे प्रवास मार्गावर ठेवण्यात येणार आहे. 40 आसनक्षमता असलेल्या चार लक्झरी बसमधून हे शिष्टमंडळ पोलीस बंदोबस्तात आपला पुणे दौरा पूर्ण करतील.

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
Embed widget