National Council of Rural Cooperative Banks : आज (12 ऑगस्ट) नवी दिल्लीत ग्रामीण सहकारी बँकांची राष्ट्रीय परिषद होणार आहे. सहकार मंत्रालय आणि नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स (NAFSCOB) म्हणजेच राष्ट्रीय राज्य सहकारी बँक संघ यांच्याद्वारे या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते या परिषदेचं उद्धाटन होणार आहे. सरकार कृषी आणि ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी विविध योजना राबवत आहे. जसजशी कृषी पायाभूत सुविधांमध्ये सरकारची गुंतवणूक वाढत आहे, तसतशी सहकारी संस्थांची भूमिका आणि क्षमताही वाढत आहे.


भारतातील अल्पकालीन सहकारी पतसंरचनेत 34 राज्य सहकारी बँका, 351 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि 96 हजार 575 प्राथमिक कृषी पत संस्था (Primary Agricultural Credit Society) यांचा समावेश आहे. राज्य आणि केंद्रीय सहकारी बँकांचे कामकाज सुलभ करण्यासाठी आणि अल्पकालीन सहकारी पतसंरचनेचा विकास करण्याच्या व्यापक उद्देशाने 19 मे 1964 रोजी राष्ट्रीय राज्य सहकारी बँक संघ स्थापन करण्यात आला होता. राष्ट्रीय राज्य सहकारी बँक संघ आपल्या सदस्यांना आणि त्यांच्या संलग्न भागधारकांना मालकांना आपली कामगिरी प्रदर्शित करण्यासाठी आणि त्यांच्या हितसंबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी एक सामायिक व्यासपीठ प्रदान करत आहे.


आजच्या या ग्रामीण सहकारी बँकांच्या राष्ट्रीय परिषदेत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, अमित शाह यांच्या हस्ते काही पुरस्कारांचे वितरण देखील होणार आहे. या कार्यक्रमात निवडक राज्य सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका (DCCBs)/ प्राथमिक कृषी पत संस्था  (PACS) यांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच 100 वर्ष सेवा प्रदान करणाऱ्या काही अल्पकालीन सहकारी पतसंस्थांचा सत्कार देखील शाह यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी.एल. वर्मा या परिषदेच्या समाप्ती सत्राला संबोधित करणार आहेत. या परिषदेला भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाचे (NCUI) अध्यक्ष दिलीप संघानी, आंतरराष्ट्रीय सहकारिता आघाडी आशिया प्रशांत क्षेत्राचे (ICA-AP) अध्यक्ष तसेच कृभकोचे अध्यक्ष डॉ. चंद्रपाल सिंह यादव, नाफेडचे अध्यक्ष डॉ. बिजेंदर सिंग आणि सहकार मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारीउपस्थित राहणार आहेत.


महत्त्वाच्या बातम्या :