एक्स्प्लोर

राष्ट्रपती निवडणूक : सुशीलकुमार शिंदे, मीरा कुमार यांची नावं चर्चेत

नवी दिल्ली : एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देण्यास काँग्रेस पक्षाने नकार दिला आहे. त्यामुळे राष्ट्रपती निवडणुकीच्या शर्यतीत यूपीए आपला उमेदवार देणार असल्याची माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी लोकसभा अध्यक्ष मीना कुमार यांची नाव सध्या चर्चेत आहेत. रामनाथ कोविंद दलित असल्याने विरोधी पक्षांकडेही आता राष्ट्रपतीपदासाठी दलित उमेदवार देणंच भाग असणार आहे. रामनाथ कोविंद एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत, अशी घोषणा भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी केली. रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा देण्याची विनंती मोदी सरकारने काँग्रेसला केली होती. परंतु भाजप-एनडीएने विरोधी पक्षांना विश्वासात न घेता कोविंद यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे, आता काँग्रेसही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात स्वत:चा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. 22 जुलै रोजी राजधानी दिल्लीत दुपारी चार वाजता होणाऱ्या विरोध पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा होणार असून, उमेदवाराचं नावही निश्चित होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया राष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. आतापर्यंत 15 उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 28 जून आहे. तर 1 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. यानंतर 17 जुलै रोजी मतदान होईल आणि 20 जुलै रोजी राष्ट्रपतींची घोषणा होईल. सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. तर नवनिर्वाचित राष्ट्रपती 25 जुलै रोजी पदभार स्वीकारतील. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतांची आकडेवारी कशी? लोकसभेतले 543 राज्यसभेतले 233 असे एकूण 776 खासदार मतदान करतात प्रत्येक खासदाराच्या एका मताची किंमत ही 708 आहे (देशातल्या सर्व आमदारांच्या मतांची एकत्र किंमत भागिले 776 असे करुन हा आकडा काढला जातो) देशातल्या एकूण आमदारांची संख्या 4120 म्हणजे 776 खासदार अधिक 4120 आमदार = 4896 जणांचं निर्वाचक मंडळ ( electoral college) ……………. आमदारांच्या एका मताची किंमत ही प्रत्येक राज्यात वेगवेगळी असते उदा. महाराष्ट्र महाराष्ट्राची 1971 मधली लोकसंख्या : 5,04,12,235 5,04,12,235 (पाच कोटी 4 लाख) भागिले 288 याचं उत्तर येतं 1,75,042 (288 नं भागण्याचं कारण विधानपरिषदेचे आमदार या निवडणुकीत मत देऊ शकत नाहीत) एका आमदाराच्या मताची किंमत काढण्यासाठी या संख्येला एक हजारने भागा, उत्तर 175.042 त्याची पूर्णांक संख्या म्हणून 175 ही महाराष्ट्रातल्या एका आमदाराच्या मताची किंमत यात 1971 हे लोकसंख्येसाठी आधारभूत वर्ष आहे ……………. यूपीत एका आमदाराच्या मताची किंमत 208, तर गोव्यासारख्या छोट्या राज्यात ती 20 आहे ……………. राष्ट्रपतींच्या निवडीसाठी एकूण मतांची किंमत 10,98,882 ( यात 776 गुणिले 708 अधिक देशातल्या एकूण आमदारांच्या मताची किंमत 5,49,474) ……………. बहुमतासाठी आकडा : 5,49,442 ……………. पाच राज्यांच्या निवडणुका होण्याआधी एनडीएकडे 4,74,336 मते होती पाच राज्यातल्या यशानंतर हा आकडा 5,29,398 झाला असला, तरी अजूनही 20,044 ने कमीच आहे शिवाय हा आकडा शिवसेनेला ग्राह्य धरूनच आहे शिवसेनेकडे 21 खासदार गुणिले 708 म्हणजे 14,868 अधिक 63 आमदार गुणिले 175 म्हणजे 11,025 अशी एकूण साधारण 25 हजार मतं आहेत शिवसेना सोबत आली नाही तर एनडीएला कमी पडणाऱ्या मतांमध्ये 25 हजारांनी वाढ होऊन ती 45 हजारांवर पोहचतात ……………. ही तूट भरून काढण्यासाठी एनडीएला बीजेडी किंवा एआयडीएमके यांची मदत घ्यावी लागेल. शिवाय काही अपक्ष आमदार, खासदारही कामी येतील ………… बीजेडी सोबत आल्यास काय बीजेडी कडे 20 लोकसभा अधिक सात राज्यसभा असे एकूण 27 खासदार 27 गुणिले 708 म्हणजे 19,116 इतकी खासदारांची मतं तर 117 आमदार आहेत एका आमदाराच्या मताची किंमत ओडिशात 149 आहे 117 गुणिले 149 म्हणजे 17,433 इतकी आमदारांची मतं आहेत. दोन्हींची बेरीज केली, तर बीजेडी सोबत आल्यास 36 हजार मतांची वाढ एनडीएला मिळू शकते …………… एआयडीएमके सोबत आल्यास काय? एआयडीएमकेकडे लोकसभेत 37 तर राज्यसभेत 13 असे एकूण 50 खासदार आहेत म्हणजे 50 गुणिले 708 म्हणजे 35 हजार 400 इतकी खासदारांची मतं आहेत तर एआयडीएमकेकडे 134 आमदार आहेत तामिळनाडूत एका आमदाराच्या मताची किंमत 176 आहे 134 गुणिले 176 म्हणजे 23,584 इतकी आमदारांची मतं आहेत दोन्हींची बेरीज केली तर एआयडीएमके सोबत आल्यास साधारण 58 हजार मतांची वाढ एनडीएला मिळू शकेल. एनडीएला अजूनही मतं कमी असल्यानं शिवसेनेचा भाव टिकून आहे संबंधित बातम्या रामनाथ कोविंद यांना JDU-BJD नंतर TRS चंही समर्थन घटना बदलण्यासाठीच भाजपकडून राष्ट्रपतीपदासाठी दलित उमेदवार : प्रकाश आंबेडकर

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्याबाबतच्या 10 खास गोष्टी

रामनाथ कोविंद 'एनडीए'चे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत भाजप शिंदे गटाचा गुंता वाढला असतानाच आता वर्षा गायकवाडांच्या भूमिकेनं भूवया उंचावल्या! गरज पडल्यास ठाकरेंच्या मदतीला धावणार की नाही?
मुंबईत भाजप शिंदे गटाचा गुंता वाढला असतानाच आता वर्षा गायकवाडांच्या भूमिकेनं भूवया उंचावल्या! गरज पडल्यास ठाकरेंच्या मदतीला धावणार की नाही?
Thane Mayor: शिंदे मुंबईमध्ये हटून बसल्याची चर्चा पण आता ठाण्यामध्ये भाजपला काय काय हवं याची यादी समोर आली!
शिंदे मुंबईमध्ये हटून बसल्याची चर्चा पण आता ठाण्यामध्ये भाजपला काय काय हवं याची यादी समोर आली!
PCMC Election 2026: पिंपरी चिंचवडकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 132 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एकाच क्लिकवर
पिंपरी चिंचवडकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 132 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एकाच क्लिकवर
Pune Election Result 2026: पुणेकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 165 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एका क्लिकवर
पुणेकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 165 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एका क्लिकवर

व्हिडीओ

Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात
Satej patil On Shivsena : कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता
Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत भाजप शिंदे गटाचा गुंता वाढला असतानाच आता वर्षा गायकवाडांच्या भूमिकेनं भूवया उंचावल्या! गरज पडल्यास ठाकरेंच्या मदतीला धावणार की नाही?
मुंबईत भाजप शिंदे गटाचा गुंता वाढला असतानाच आता वर्षा गायकवाडांच्या भूमिकेनं भूवया उंचावल्या! गरज पडल्यास ठाकरेंच्या मदतीला धावणार की नाही?
Thane Mayor: शिंदे मुंबईमध्ये हटून बसल्याची चर्चा पण आता ठाण्यामध्ये भाजपला काय काय हवं याची यादी समोर आली!
शिंदे मुंबईमध्ये हटून बसल्याची चर्चा पण आता ठाण्यामध्ये भाजपला काय काय हवं याची यादी समोर आली!
PCMC Election 2026: पिंपरी चिंचवडकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 132 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एकाच क्लिकवर
पिंपरी चिंचवडकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 132 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एकाच क्लिकवर
Pune Election Result 2026: पुणेकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 165 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एका क्लिकवर
पुणेकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 165 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एका क्लिकवर
Nashik Election Result 2026 All Winner List: नाशिककरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 122 नवनिर्वाचित नगरसेवक, पाहा सर्व विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर...
नाशिककरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 122 नवनिर्वाचित नगरसेवक, पाहा सर्व विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर...
BMC Election Result 2026: उमेदवारी अर्जासाठीही उधार पैसे घेत निवडणूक लढला, ओवैसींचा विश्वास सार्थकी लावत दणदणीत विजय; मुंबईतील MIMचा हिंदू नगरसेवक कोण?
उमेदवारी अर्जासाठीही उधार पैसे घेत निवडणूक लढला, ओवैसींचा विश्वास सार्थकी लावत दणदणीत विजय; मुंबईतील MIMचा हिंदू नगरसेवक कोण?
Chhatrapati Sambhajinagar MIM Winner List: गुलमंडीसारख्या शिवसेनेच्या गडातही उमेदवारांची बाजी; काकासाहेब काकडे ते सुनीता वाहुळ, संभाजीनगरमधील MIM चे नगरसेवक कोण कोण?
गुलमंडीसारख्या शिवसेनेच्या गडातही उमेदवारांची बाजी; काकासाहेब काकडे ते सुनीता वाहुळ, संभाजीनगरमधील MIM चे नगरसेवक कोण कोण?
Malegaon Election Result 2026 : मालेगावकरांनो 'हे' आहेत तुमच्या महापालिकेतील 84 नवनिर्वाचित नगरसेवक, इस्लाम पार्टीचे 35, एमआयएमचे किती? पाहा यादी
मालेगावकरांनो 'हे' आहेत तुमच्या महापालिकेतील 84 नवनिर्वाचित नगरसेवक, इस्लाम पार्टीचे 35, एमआयएमचे किती? पाहा यादी
Embed widget