Vijaya Dashami 2020: देशभरात दसऱ्याचा उत्साह, राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शुभेच्छा
दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक मान्यवरांनी देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीपर दसरा साजरा करताना नियमांचे पालन करावे असेही आवाहन करण्यात आले आहे.
भारताच्या राष्ट्रपतींनीही देशवासीयांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आजचा दिवस हा अधर्मावर धर्माचा विजय आणि असत्यावर सत्याचा विजयाचा आहे. आनंद आणि उत्साहाचा हा सण कोरोनाच्या महामारीच्या प्रभावापासून सर्वांची रक्षा करेल आणि सर्वांच्या जीवनात सुख आणि समृध्दी आणेल अशी आशा आहे असे त्यांनी म्हटले आहे.सभी देशवासियों को विजयादशमी की ढेर सारी शुभकामनाएं। बुराई पर अच्छाई और असत्य पर सत्य की जीत का यह महापर्व हर किसी के जीवन में नई प्रेरणा लेकर आए।
— Narendra Modi (@narendramodi) October 25, 2020
देशाचे उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनीही दसऱ्यानिमित्त देशवासीयांना दिलेल्या शुभेच्छात म्हटले आहे की हा सण भारतीयांच्या जीवनात शांती, सद्भाव आणि समृध्दी आणेल. आप्तस्वकीयांची भेट व्हावी यासाठी सण साजरा केला जातो. परंतु कोरोनाची जागतिक महामारी लक्षात घेता या वर्षी सर्व नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करून पारंपरिक पध्दतीने दसरा साजरा करावा असे आवाहन त्यांनी केलं आहे.Greetings and good wishes to fellow citizens on Dussehra. This festival symbolises the triumph of good over evil. May this festival of joy and happiness protect us from the evil effects of the ongoing pandemic and bring prosperity and affluence to the people of the country.
— President of India (@rashtrapatibhvn) October 25, 2020
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा देताना म्हटले आहे की शेवटी विजय हा सत्याचा होतो.I extend my warm greetings and good wishes to the people of our country on the auspicious occasion of Dussehra. Celebrated with great fervour and zeal all over the country, #Dussehra symbolizes the victory of good over evil.#HappyDussehra
— Vice President of India (@VPSecretariat) October 25, 2020
राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि माजी कृषीमंत्री शरद पवारांनी देशवासीयांना दिलेल्या संदेशात म्हटले आहे की विजायदशमीला शस्त्रांची पूजा होते. कोरोना महामारीच्या काळात मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग हीच कोरोनाशी लढण्यासाठी आपली महत्त्वाची अस्त्रे आहेत. त्यांच्या वापर करूया आणि कोरोनारूपी शत्रूवर विजय मिळवूया.विजय अंततः सत्य की ही होती है।
आप सभी को विजयदशमी की शुभकामनाएँ।#HappyDussehra — Rahul Gandhi (@RahulGandhi) October 25, 2020
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंनी त्यांच्या संदेशात म्हटले आहे की विजयादशमीचा महापर्व मनुष्याला अधर्म, अहंकार आणि असत्याचा त्याग करायला लावते आणि त्याला धर्म, विवेक आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देणारे पर्व आहे.विजायदशमीला शस्त्रांची पूजा होते. कोरोना महामारीच्या काळात मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग हीच कोरोनाशी लढण्यासाठी आपली महत्त्वाची अस्त्रे आहेत. त्यांच्या वापर करूया आणि कोरोनारूपी शत्रूवर विजय मिळवूया. आपण सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!#Dasara2020 pic.twitter.com/HhZiHcEDEf
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 25, 2020
दसऱ्याच्या निमित्ताने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सिक्कीमच्या नथुला क्षेत्रात जाऊन भारतीय सेनेच्या जवानांची भेट घेतली आहे आणि तिथेच त्यांनी शस्त्रपूजा केली आहे. या सणाच्या निमित्ताने त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.विजयादशमी का महापर्व मनुष्य को अधर्म, अहंकार और असत्य का परित्याग कर धर्म, विवेक और सत्य के मार्ग पर चलने की प्रेरणा व शिक्षा देने वाला पर्व है।
प्रभु श्री राम हमें बुराइयों पर विजय प्राप्त करने की शक्ति दें। 'विजयादशमी' की हार्दिक शुभकामनाएँ जय श्री राम! pic.twitter.com/DNkbPDocWg — Amit Shah (@AmitShah) October 25, 2020
कोरोना संकटावर मात करून महाराष्ट्र नव्या जोमाने भरभराट आणि समृद्धीकडे वाटचाल करेल, असा विश्वास व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दसऱ्याच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या संदेशात म्हटले आहे की विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळविण्याची प्रेरणा. यंदाच्या या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा घेत आपण एकजुटीने कोरोना विषाणूरूपी रावणाचा नाश करूया!विजयादशमी पर्व पर आयोजित शस्त्रपूजन समारोह में भाग ले रहा हूँ। हमसे जुड़िए https://t.co/sNQyKUm9f0
— Rajnath Singh (@rajnathsingh) October 25, 2020
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना म्हटले आहे की दसऱ्याच्या निमित्तानं आपणा सर्वांच्या घरात धनधान्याची आणि मनात चांगल्या विचारांची समृद्धी यावी, अशा शुभेच्छा! दुष्प्रवृत्तींवर सत्प्रवृत्तीच्या विजयाचा हा उत्सव सर्वांनी आनंदानं, उत्साहानं, सोशल डिस्टन्सिंग व कोरोनाप्रतिबंधक नियमांचं पालन करून साजरा करूया!विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळविण्याची प्रेरणा. यंदाच्या या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा घेत आपण एकजुटीने कोरोना विषाणूरूपी रावणाचा नाश करूया!
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 24, 2020
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही विजयादशमीच्या सर्वांना शुभेच्छा देताना म्हटले आहे की हा सण म्हणजे अनिष्ट प्रथांवर विजयाचे पर्व अशा प्रकारचा आहे.दसऱ्याच्या निमित्तानं आपणा सर्वांच्या घरात धनधान्याची आणि मनात चांगल्या विचारांची समृद्धी यावी, अशा शुभेच्छा! दुष्प्रवृत्तींवर सत्प्रवृत्तीच्या विजयाचा हा उत्सव सर्वांनी आनंदानं, उत्साहानं, सोशल डिस्टन्सिंग व कोरोनाप्रतिबंधक नियमांचं पालन करून साजरा करूया!#Dussehra pic.twitter.com/ByY5gBtulR
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 25, 2020
आपल्या 40 वर्षांच्या कालावधीत भाजपचा विस्तार करायचं काम करणारे आणि नुकतेच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांनी राज्यातील जनतेला दसऱ्याच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की महाराष्ट्राच्या विकासासाठी, अस्मिता जपण्यासाठी सिमोल्लंघन करूया.अनिष्ट प्रथांवर विजयाचे पर्व! विजयादशमीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा !#HappyDussehra ! #Vijayadashami pic.twitter.com/PqODCeyUkC
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 25, 2020
राष्ट्रवादी पक्षाचे युवा आमदार रोहित पवारांनीही या प्रसंगी देशावर आणि राज्यावर आलेल्या वेगवेगळ्या संकटांना पराभूत करूया असे म्हणत जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.#सिमोल्लंघन...विकासासाठी... रखडलेल्या प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी... महाराष्ट्राच्या हितासाठी... अस्मिता जपण्यासाठी... चला... सोबत येऊन एक नवे पर्व घडवू या! महाराष्ट्रातील जनतेला #विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! pic.twitter.com/q9LtXsmdNS
— Eknath Khadse (@EknathGKhadse) October 25, 2020
सीमेवर शत्रूचं संकट देशावर आर्थिक संकट युवांवर बेरोजगारीचं संकट आरोग्यावर कोरोनाचं संकट बळीराजावर अतिवृष्टीचं संकट
यंदा आपल्यावर एकामागोमाग एक आलेल्या या संकटांना पराभूत करून विजयाचं सीमोल्लंघन करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करुया!!!! सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! — Rohit Pawar (@RRPSpeaks) October 25, 2020