नवी दिल्ली : देशातल्या गरीब कुटुंबांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकारने एक पाऊल उचललं आहे. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या (PMSBY) अंतर्गत आता दर महिन्याला केवळ एक रुपया भरावा लागणार आहेत आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाला दोन लाखांच्या विम्याचे सुरक्षा कवच मिळणार आहे.
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात विमा ही केवळ गुंतवणूक नव्हे तर अत्यंत आवश्यक बाब बनली आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाला सामाजिक सुरक्षा मिळू शकते. उच्च मध्यम वर्गातील बहुतांशी लोक आपला विमा उतरवतात पण गरीब लोकांना याचे प्रिमियम भरायला परवडत नसल्याने ते याकडे वळत नाहीत. त्यामुळे गरीब कुटुंबांच्या सामाजिक सुरक्षेसाठी केंद्र सरकारने ही योजना सुरु केली आहे.
पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या (PMSBY) अंतर्गत वर्षाला 12 रुपये भरावे लागणार असून त्यामुळे दोन लाखांचा अपघात विमा सुरक्षा मिळणार आहे. या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वर्षाला एकदाच हा 12 रुपयाचा प्रिमियम भरावा लागणार असून ते आपल्या बँकेच्या अकाऊंटमधून आपोआप कट होणार आहेत.
या योजनेसाठी रजिस्ट्रेशन केल्यास दर वर्षाच्या 31 मे पूर्वी आपल्या अकाऊंटमधून 12 रुपये कट होणार आहेत आणि आपल्याला 1 जून ते 31 मे या कालावधीच्या दरम्यान विम्याची सुरक्षा मिळणार आहे. या योजनेनुसार, व्यक्तीचा अपघात झाल्यास किंवा त्याला कायमचे अपंगत्व आल्यास दोन लाख रुपयांचा अपघाती विमा मिळेत तर जखमी झाल्यास किंवा तात्पुरते अपंगत्व आल्यास त्याला एक लाख रुपयाचा विमा मिळणार आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आपल्या बँकेच्या अकाऊंटमध्ये बॅलेन्स असणं आवश्यक आहे. बँक खाते बंद झाल्यास पॉलिसी बंद पडते.
कसं करायचं रजिस्ट्रेशन?
या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला आपल्या जवळच्या बँकेत जावं लागेल आणि तसा अर्ज करावा लागेल. यासाठी आपण बँक मित्रांचीही मदत घेऊ शकता. केंद्र सरकार सर्व सार्वजनिक आणि खासगी बँकांच्या सहकार्यांने ही योजना राबवत आहे.
कोणत्या वयोगटातील व्यक्तींना होणार याचा लाभ?
पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा (PMSBY) लाभ 18 ते 70 वयोगटातील लोकांना होणार आहे. जर एखाद्याचे वय 70 वर्षाच्या वरती असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
महत्वाच्या बातम्या :