मुंबई : भारतात डिजिटल करन्सी लागू करण्याकडे एक पाऊल पडत असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता सेंट्रल बॅंक डिजिटल करन्सी (CBDC) च्या माध्यमातून देशात डिजिटल करन्सी सुरु करण्याच्या तयारीत आहे. देशभरात टप्प्याटप्प्याने डिजिटल करन्सी लागू करण्यात येणार आहे. जगभरात अनेक देशांमध्ये डिजिटल करन्सी लागू करण्याचा विचार सुरु आहे. भारतातही डिजिटल करन्सी लागू करण्याची गरज असल्याचं मत आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी. शंकर यांनी गेल्या आठवड्यात व्यक्त केलं होतं.


भारतात सुरु होणारी डिजिटल करन्सी ही क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनसारखीच असणार आहे. पण बिटकॉईनपेक्षाही त्यामध्ये अधिक पारदर्शकता असेल आणि ती कायदेशीर असेल. आरबीआयचे यावर काम सुरु असून लवकरच याबद्दलचे धोरण जाहीर होण्याची शक्यता आहे.  


फेब्रुवारी महिन्यामध्ये डिजिटल करन्सीवर भाष्य करताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले होते की, "सेंट्रल बॅंक डिजिटल करन्सी (CBDC) च्या माध्यमातून देशात क्रिप्टोकरन्सीचा  वापर करता येतो का याची चाचपणी सुरु आहे. डिजिटल क्रांतीमध्ये भारत कुठेही मागे राहता कामा नये यासाठी हे पाऊल उचललं जात आहे."


डिजिटल करन्सीचा वापर करुन आपण मोबाईल किंवा लॅपटॉपवरुन आपल्या पैशाचा व्यवहार करु शकतो. यामध्ये तिसऱ्या व्यक्ती किंवा मध्यस्ताची गरज नसते. गेल्या एक-दोन वर्षांमध्ये डिजिटल पेमेंट अॅपमुळे भारतातील हार्ड कॅश व्यवहार हे बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहेत. या पेमेंट अॅपपेक्षाही अधिक सुलभता या डिजिटल करन्सीमुळे येण्याची शक्यता आहे. 


भारतात अद्याप क्रिप्टोकरन्सीच्या वापराला मान्यता नाही. आरबीआय आणि सेबी यांसारख्या नियामक मंडळांकडे क्रिप्टोकरन्सीच्या वापराबाबत निश्चित असे नियम नाहीत. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या वापरावर थेट नियंत्रण ठेवता येत नाही. या आधी आरबीआयने बिटकॉइनसारख्या व्हर्च्युअल करन्सीच्या वापरावर 2018 साली बंदी घातली होती. ती बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली होती.


महत्वाच्या बातम्या :