एक्स्प्लोर
गोव्यात राजकीय घडामोडींना वेग, नेतृत्त्वबदलाची शक्यता : सूत्र
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनीही घटक पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधल्याची माहिती मिळतेय.

पणजी : गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, नेतृत्त्वबदलाची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री पर्रिकर यांची भाजपच्या कोअर कमिटीने भेट घेऊन चर्चा केली. उद्या भाजपचे निरीक्षक गोव्यात येऊन निर्णय घेण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनीही घटक पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधल्याची माहिती मिळतेय. कोअर टीमने हॉस्पिटल मध्ये घेतली पर्रिकर यांची भेट राज्यात पर्रिकर यांच्या आजारपणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आज तातडीची कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली होती. मुख्यमंत्री पर्रिकर यांनी या कमिटीला हॉस्पिटलमध्ये बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. भाजप आघाडी सरकारचे घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते कृषी मंत्री विजय सरदेसाई आणि मगो नेते तथा बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी देखील पर्रिकर यांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतल्याने येत्या 2 दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी मनोहर पर्रिकर रुग्णालयातून घरी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे दरवर्षी न चुकता आपल्या पर्रा येथील मूळ घरातील गणपतीचे दर्शन घेतात. यंदा आजारपणामुळे त्यांना गणपती दर्शन घेणे शक्य होईल की नाही याबाबत साशंकता होती. मात्र सगळ्यांना चकित करत हॉस्पिटलमधून त्यांनी घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले आणि परत हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. गेल्या तीन दिवसांपासून पर्रिकर हे कांदोळी येथील त्यांचे जवळचे नातेवाईक असलेल्या दुकले यांच्या खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत. आज सायंकाळी 4 वाजता पर्रिकर यांनी कांदोळी येथून जवळच असलेल्या पर्रा येथील आपल्या मुळ घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. पर्रिकर जास्त वेळ घरी थांबले नाहीत. आल्या पावली ते लगेच हॉस्पिटल मध्ये परत आले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
पुणे
निवडणूक
कोल्हापूर























