एक्स्प्लोर

Kisan Rail | महाराष्ट्र- पश्चिम बंगालदरम्यान धावणाऱ्या 100 व्या 'किसान रेल्वे' ला पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा

व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 डिसेंबर रोजी 100 व्या 'किसान रेल्वे' ला (Kisan Rail) हिरवा झेंडा दाखवणार आहेत. महाराष्ट्र ते पश्चिम बंगाल दरम्यान धावणारी ही गाडी कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी गेम चेंजर ठरणार आहे असा दावा केला जातोय.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील 100 व्या किसान रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. 28 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4.30 वाजता हा कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडणार आहे. या प्रसंगी पंतप्रधानांसोबत रेल्वे मंत्री पियूष गोयल आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्रातील सांगोला ते पश्चिम बंगालमधील शालिमार या दरम्यान धावणारी ही किसान रेल्वे कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी गेम चेंजर ठरणार आहे असा दावा केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. ही किसान रेल्वे देशातील 100 वी किसान रेल्वे असणार आहे.

मल्टी-कमोडिटी ट्रेन असणाऱ्या या गाडीच्या माध्यमातून फ्लॉवर, शिमला मिर्ची, कोबी, ड्रमस्टिक, मिर्ची, कांदा यासारख्या भाज्यांची वाहतूक केली जाणार आहे. तसेच जांभूळ, संत्री, केळी तसेच इतर काही फळांचीही वाहतूक करण्यात येणार आहे. या गाडीमध्ये नाशवंत कृषी उत्पादनांच्या वाहतूकीला परवानगी देण्यात आली आहे. भारत सरकारने फळे आणि भाज्यांच्या वाहतूकीसाठी 50 टक्के अनुदान जाहीर केलं आहे.

किसान रेल्वेची सुरुवात 7 ऑगस्ट 2020 रोजी करण्यात आली आहे. पहिली गाडी देवळाली ते दानापूर या दरम्यान सुरु झाली. नंतर याचा मार्ग मुझफ्फरपूर पर्यंत वाढवण्यात आला. या गाडीला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने याच्या फेऱ्या आठवड्यातून तीन वेळा वाढवण्यात आल्या. किसान रेल्वे देशभरातील कृषी उत्पादनाच्या वाहतूकीमध्ये एक महत्वाची भूमिका पार पाडत आहे.

महत्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "आंदोलकांना मारहाण अन् बळजबरीने..."
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना 'जंतर मंतर'वरुन हटवलं, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, रुग्णालयात पाठवलं
सोनम वांगचुक यांना 'जंतर मंतर'वरुन हटवलं, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, रुग्णालयात पाठवलं
UCC : जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget