एक्स्प्लोर

कोरोनावरील भारतातील लसींची प्रगती काय? पंतप्रधान मोदी म्हणाले...

कोरोनावर लस कधी येणार हा सवाल आज प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे. भारतात या लशींची स्थिती काय आहे, याबाबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणात माहिती दिली.

नवी दिल्ली : कोरोनावर लस कधी येणार हा सवाल आज प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे. भारतात या लशींची स्थिती काय आहे, याबाबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणात माहिती दिली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोनावरची लस कधी होणार? हा प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे. भारतात एक दोन नव्हे तर तीन-तीन लसी प्रगतीपथावर आहेत. जेव्हा वैज्ञानिक चाचण्या पूर्ण होतील तेव्हा वेगानं उत्पादन होऊन ते लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा याचा आराखडा तयार आहे, असं ते म्हणाले. कोरोना मोठं संकट आहे, मात्र हे संकट इतकं मोठं नाही की ते आपल्या आत्मनिर्भर भारताच्या प्रवासाला रोखू शकेल, असं मोदी यावेळी म्हणाले. सर्व कोरोना वॉरिअर्सना नमन ते म्हणाले की, जे लोक विस्तारवाच्या भूमिकेत मग्न होते, त्यांनी सर्व जगाला दोन महायुद्धांमध्ये होरपळून टाकलं. मात्र अशा कालखंडातही भारतानं स्वातंत्र्यांची लढाई चालू ठेवली. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी म्हटलं की, सर्व कोरोना वॉरिअर्सना मी नमन करतो. अनेकांनी प्राणही गमावले. मला विश्वास आहे की आपण विजयी होणारच. कोरोनाच्या संकटात आपल्या जीवाची पर्वा न करता, डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, अॅम्ब्युलंस कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचाऱ्यांसह अनेक लोक 24 तास सातत्याने काम करत आहेत, असं ते म्हणाले. जगामध्ये भारताचे योगदान वाढणे काळाची गरज  मोदी यावेळी म्हणाले की, भारत सध्या केवळ आपल्या गरजेपुरतेच अन्नधान्य पिकवत नसून, ज्यांना गरज असेल त्यांना देखील अन्नाचा पुरवठा करू शकेल अशा स्थितीत आहे. कृषी क्षेत्रात भारताने आत्मनिर्भर उद्दिष्ट साध्य केले आहे. आपल्याला मूल्यवर्धनाची आणि आपल्या कृषी क्षेत्रात आणखी परिवर्तनाची गरज आहे. संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे ही भारताची धारणा नेहमीच कायम राहिली आहे. ज्यावेळी आपण आर्थिक वृद्धी आणि विकास यावर लक्ष केंद्रित करत आहोत, त्यावेळी आपल्या या प्रवासात मानवता केंद्रस्थानी असलीच पाहिजे. जगामध्ये भारताचे योगदान वाढणे ही काळाची गरज आहे, यासाठी भारत आत्मनिर्भर बनणे गरजेचे आहे. आपण भारताचंच नाही तर जगातील अनेक देशांचं पोट भरु शकतो यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, आज जगातील अनेक मोठ्या कंपन्या भारतात येत आहेत. आता आपल्याला 'मेक इन इंडिया'सोबत 'मेक फॉर वर्ल्ड' या मंत्रासह पुढे जायचं आहे. एक काळ होता, ज्यावेळी आपली शेतीव्यवस्था अतिशय मागास होती, तेव्हा देशवासियांचं पोट कसं भरणार ही सर्वात मोठी चिंता होती. आज आपण केवळ भारताचंच नाही तर जगातील अनेक देशांचं पोट भरु शकतो, असं मोदी यावेळी म्हणाले. स्वत:च्या पायावर उभे राहणे अपरिहार्य कोरोना संकटात 'आत्मनिर्भर भारत' हा 130 कोटी भारतीयांसाठी मंत्र बनला आहे. 'आत्मनिर्भर भारत' हे स्वप्न प्रत्यक्षात येणारच. देशातील तरुण, महिला शक्तीवर माझा पूर्ण विश्वास आहे, असं मोदी म्हणाले. भारतासाठी स्वत:च्या पायावर उभे राहणे अपरिहार्य असून आपण निश्चितच हे स्वप्न पूर्ण करु. मला आपल्या देशातील गुणवत्तेवर पूर्ण विश्वास आहे. आपल्या नागरिकांवर, युवकांवर आणि महिलांवर विश्वास आहे. भारताच्या दृष्टीकोनावर माझा विश्वास आहे, असं मोदी म्हणाले. मोदी यावेळी म्हणाले की, वेदांमध्ये वसुधैव कुटुंबम सांगितलंय, तसंच विनोबा भावे म्हणत होते जय जगत. भारतानं विश्व हेच आपलं घर ही संकल्पना कायम जोपासलीय, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget