एक्स्प्लोर

Narendra Modi | ... म्हणून जगभरात भारताचं कौतुक होतंय : पंतप्रधान मोदी

देशभरात पोलिसिंगची मानवीय आणि संवेदनशील बाजू आमच्यासमोर आली आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी रेडिओ कार्यक्रम 'मन की बात' च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

नवी दिल्ली :  संकटाच्या काळात भारतानं जगाला आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवलं. त्यामुळेच आज भारताचे आभार मानले जात आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पुढच्या 'मन की बात' पर्यंत जगात कोरोनाबाबत दिलासा मिळाल्याची बातमी मिळेल, असा विश्वास देखील मोदी यांनी व्यक्त केला.  पंतप्रधान मोदी यांनी  रेडिओ कार्यक्रम 'मन की बात' च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी मोदी म्हणाले, संपूर्ण जग कोरोनाविरोधात एकवटलं आहे. जेव्हा भविष्यात याची चर्चा होईल, तेव्हा भारतातील जनतेनं याविरोधात कसा लढा दिला, याची दखल घेतली जाईल. लॉकडाऊनच्या काळात देश कसा एकजूट झाला. लॉकडाऊच्या काळात प्रत्येकजण आपापल्या परीनं लढत आहे. सफाई कर्मचाऱ्यांपासून ते पोलिसांपर्यत सगळ्यांचा जनतेच्या मनातील आदर वाढला आहे. कोरोनाच्या काळात सगळेचं झोकून देऊन काम करत आहेत. देशवासियांच्या या भावनेला मी नमन करतो, असं म्हणत मोदी यांनी सामाजिक कार्यात पुढे आलेल्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, स्थानिक प्रशासन, राज्य सरकारं ज्या जबाबदारीचं पालन करत आहेत, त्यांची कोरोनाविरोधातल्या लढ्यात खूप मोठी भूमिका आहे. त्यांचे हे परिश्रम अत्यंत प्रशंसनीय आहेत.  आज, देशाच्या कानाकोपऱ्यातनं लोक स्वच्छता कामगारांवर पुष्पवर्षाव करत असल्याची छायाचित्रं येत आहेत. डॉक्टर असो, पोलिस असो, व्यवस्थेबद्दलही सामान्य लोकांच्या मानसिकतेत मोठं परिवर्तन घडलं आहे. पोलिसिंगची मानवीय आणि संवेदनशील बाजू आमच्यासमोर आली आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यावेळी ते म्हणाले की, अलिकडेच जो अध्यादेश आणला आहे, त्याबद्दल समाधान व्यक्त केलं गेलं आहे. यात, कोरोना योद्ध्यांबरोबर जे हिंसा, छळ करण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्याविरोधात अत्यंत कडक शिक्षेची तरतूद आहे. आमचे डॉक्टर, परिचारिका, यासर्वांचं संरक्षण करण्यासाठी हे पाऊल अत्यंत आवश्यक होतं, असं ते म्हणाले. आपल्यातील बहुतेकांना हे ठाऊक असेल की देशातल्या प्रत्येक भागात औषधे पोहचवण्यासाठी आपण #LifeLineUdan मोहिमेद्वारे देशातल्या देशातच, 3 लाख किलोमीटर अंतराचं हवाई उड्डाण केलं आहे आणि 500 टनाच्यापेक्षाही जास्त वैद्यकीय साहित्य, देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आपल्यापर्यंत पोहचवलं आहे, असं मोदी यांनी सांगितलं. भारतीय रेल्वेनं जवळजवळ 60 पेक्षा जास्त रेल्वेमार्गांवर 100 हून जास्त पार्सल ट्रेन्स सुरू केल्या आहेत. औषधांचा पुरवठा करण्यात, आमच्या टपाल खात्याचे लोक, अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत. आमचे हे सर्व साथीदार खऱ्या अर्थानं कोरोनाचे योद्धेच तर आहेत, अशा शब्दात त्यांनी कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. ते म्हणाले की, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरिबांच्या खात्यांमध्ये, पैसे थेट जमा केले जात आहेत. वृद्धावस्था पेन्शन जारी केली गेली आहे. गरिबांना तीन महिने विनामूल्य गॅस सिलेंडर, रेशनसारख्या सुविधा प्रदान केल्या जात आहेत. मी, राज्य सरकारांचीही प्रशंसा करतो की ते या महामारीचा सामना करण्यात अत्यंत सक्रिय भूमिका बजावत आहेत, असंही मोदी म्हणाले. मोदी म्हणाले की, आपण कुठेही पाहिलंत तर, आपल्याला याची जाणीव होईल की, भारताची लढाई लोकांनी चालवलेली आहे. पूर्ण जग या महामारीच्या संकटाशी मुकाबला करत आहे. भविष्यात जेव्हा याची चर्चा होईल, तेव्हा भारताच्या या लोकांनी चालवलेल्या लढाईची चर्चा होणारच, असा मला विश्वास आहे. भारताची कोरोनाच्या विरोधातील लढाई ही खऱ्या अर्थाने लोकांनीच नेतृत्व केलेली आहे. भारतात कोरोनाच्या विरोधातील लढाई जनता लढत आहे, आपण लढत आहात, जनतेबरोबरीने एकत्रितपणे शासन, लढत आहे. विकासासाठी प्रयत्नशील भारतासारखा विशाल देश, गरिबीशी निर्णायक लढा देत आहे. या परिस्थितीत आपण सर्व देशवासियांनी जी संकल्प शक्ति दाखवली आहे, त्यानं, भारतात एका परिवर्तनाची सुरूवात झाली आहे. आमचे व्यवसाय, आमची कार्यालये, आमचे वैद्यकीय क्षेत्र, प्रत्येकजण, वेगानं, नव्या तांत्रिक बदलांकडे पुढे निघाला आहे, असंही मोदी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Jantar Mantar Protest Rules : जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'
जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'
मोठी बातमी! 150 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज, लखनौमध्ये नेमकं काय घडलं? 
मोठी बातमी! 150 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज, लखनौमध्ये नेमकं काय घडलं? 
जोपर्यंत भारतात सनातनची शक्ती, तोपर्यंत तुम्ही नरेंद्र मोदींच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, आसामच्या मुख्यमंत्र्याचा राहुल गांधींना इशारा 
जोपर्यंत भारतात सनातनची शक्ती, तोपर्यंत तुम्ही नरेंद्र मोदींच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, आसामच्या मुख्यमंत्र्याचा राहुल गांधींना इशारा 
दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा, 24 तासात राहुल गांधींना पोलिसांनी दोनदा घेतलं ताब्यात, खर्गे म्हणाले, आम्ही घाबरणार नाही
दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा, 24 तासात राहुल गांधींना पोलिसांनी दोनदा घेतलं ताब्यात, खर्गे म्हणाले, आम्ही घाबरणार नाही

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget