एक्स्प्लोर

राहुल गांधींनी कोणत्याही भाषेत, अगदी मातृभाषेत 15 मिनिटं बोलावं : मोदी

कर्नाटक सरकारने केलेली चांगली कामगिरी कुठलाही कागद न वाचता 15 मिनिटांत सांगा. हिंदी, इंग्रजी अशा कोणत्याही भाषेत बोला. अगदीच काय मातृभाषेत बोलून दाखवा, असं मोदी म्हणाले.

बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पहिल्याच प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. राहुल यांनी हातात कागद न घेता कोणत्याही भाषेत 15 मिनिटं बोलावं, वाटल्यास मातृभाषेत बोलावं, असं खुलं आव्हान मोदींनी दिलं. कर्नाटकमधील चामरानगरमध्ये मोदींनी जनतेशी संवाद साधला. आज एकाच दिवसात कर्नाटकात पंतप्रधानांच्या तीन प्रचारसभा होणार आहेत. राहुल गांधी यांनी 17 एप्रिलला अमेठीमध्ये केलेल्या भाषणाचं उत्तर म्हणून मोदींनी हे आव्हान दिलं. 'मोदी संसदेत उभं राहायला घाबरतात. जर मोदींसमोर मला राफेल विमान खरेदीबाबत 15 मिनिटं बोलायची परवानगी मिळाली, तर मोदी त्याला सामोरं जाऊ शकणार नाहीत' असं राहुल गांधी म्हणाले होते. 'काँग्रेस अध्यक्षांनी मला आव्हान दिलं होतं. जर ते 15 मिनिटं संसदेत बोलले, तर मी बसू शकणार नाही. त्यांचं बरोबरच आहे. माझ्यासारखा एखादा सामान्य माणूस, ज्याला धड चांगले कपडेही घालता येत नाही, तो काँग्रेस अध्यक्षांसारख्या प्रभावी व्यक्तीसमोर बसूच शकत नाही. कारण ते नामदार आहेत, तर मी कामदार. मी तुम्हाला (राहुल गांधी) आव्हान देतो, कर्नाटक सरकारने केलेली चांगली कामगिरी कुठलाही कागद न वाचता 15 मिनिटांत सांगा. हिंदी, इंग्रजी अशा कोणत्याही भाषेत बोला. अगदीच काय मातृभाषेत बोलून दाखवा' असं मोदी म्हणाले. राहुल यांच्या मातोश्री म्हणजेच सोनिया गांधींच्या इटालियन भाषेवरुन केलेली ही टिपण्णी मोदींनी राहुल गांधींवर केलेली सर्वात जहाल टीका मानली जात आहे. कर्नाटक विधानसभेची निवडणूक 12 तारखेला होणार आहे. सध्या सत्तेत असलेल्या काँग्रेसला हटवणं आणि आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं नवी ऊर्जा निर्माण करणं, हे भाजपसमोर मोठं आव्हान आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Wangchuk Jantar Mantar Protest: 'मी आजच आंदोलन मागे घेतो पण....'; सोनम वांगचूक यांच्या केंद्र सरकारसमोर 'या' तीन अटी
'मी आजच आंदोलन मागे घेतो पण....'; सोनम वांगचूक यांच्या केंद्र सरकारसमोर 'या' तीन अटी
Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर मध्यरात्री पोलिसांच्या हालचालींना वेग, अचानक सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले, बॅरिकेडस हटवले, चर्चांना उधाण
जंतरमंतरवर मध्यरात्री पोलिसांच्या हालचालींना वेग, अचानक सीसीटीव्ही कॅमेरे बंद, बॅरिकेडस हटवले, चर्चांना उधाण
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Jantar Mantar Protest: 'मी आजच आंदोलन मागे घेतो पण....'; सोनम वांगचूक यांच्या केंद्र सरकारसमोर 'या' तीन अटी
'मी आजच आंदोलन मागे घेतो पण....'; सोनम वांगचूक यांच्या केंद्र सरकारसमोर 'या' तीन अटी
FIFA World Cup 2026 : स्पेन पुन्हा ठरला जगज्जेता! तब्बल 16 वर्षांनी स्पेननं कोरलं विश्वचषकावर नाव; GOAT मेस्सीच्या अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं
तब्बल 16 वर्षांनी स्पेन पुन्हा ठरला जगज्जेता! फिफा विश्वचषकावर दुसऱ्यांदा कोरलं नाव; GOAT मेस्सीच्या अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा जेतेपदाचं स्वप्न भंगलं
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Maharashtra Live blog updates: मुंबईत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, तलावांमधील पाण्याचा साठा वाढला
Maharashtra Live blog updates: मुंबईत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, तलावांमधील पाण्याचा साठा वाढला
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर मध्यरात्री पोलिसांच्या हालचालींना वेग, अचानक सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले, बॅरिकेडस हटवले, चर्चांना उधाण
जंतरमंतरवर मध्यरात्री पोलिसांच्या हालचालींना वेग, अचानक सीसीटीव्ही कॅमेरे बंद, बॅरिकेडस हटवले, चर्चांना उधाण
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Embed widget