एक्स्प्लोर
मुस्लिमांना व्होट बँक समजू नका, मोदींनी ठणकावलं

कोळीकोड : मुस्लिमांचा तिरस्कार करु नका, तर त्यांचा स्वीकार करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मुस्लीम समाजाकडे व्होट बँक म्हणून पाहू नका, असं वक्तव्यही मोदींनी कोळीकोडमध्ये केलं आहे. मुस्लिमांच्या मतांना केवळ बाजारातील वस्तू समजणाऱ्या विरोधकांना मोदींनी धारेवर धरलं. समाजामध्ये एकात्मतेची भावना कायम असली पाहिजे. राज्यकर्ते आणि पक्षाबाबत सामान्यांच्या मनात शंका निर्माण होणे, हे लोकशाहीसाठी घातक असल्याचं मोदींनी सांगितलं. केरळमधल्या कोळीकोडमध्ये पंडित दीनदयाळ यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते.
दहशतवाद्यांनो, उरी हल्ला आम्ही कधीही विसरणार नाही : मोदी
भाजपसाठी समाजातील कोणताही वर्ग अस्पृश्य नसल्याचं मोदींनी स्पष्टपणे सांगितलं. आमची विकासयात्रा सगळ्यांना सोबत घेऊन निघाली असून कोणीच मागे राहणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.संबंधित बातम्या :
उरी हल्ल्याचा सूड घेणारच, 'मन की बात'मधून मोदींचा पुनरुच्चार
काश्मीरमधील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणार : अमित शाह
पाकचा खरा चेहरा जगासमोर उघडा पाडण्यासाठी सुषमा स्वराज न्यूयॉर्कमध्ये दाखल
नुसते इशारे नको, ठोस कृती करा, सेनेच्या मोदींना कानपिचक्या
आणखी वाचा























