एक्स्प्लोर

10 वर्ष सत्ता उपभोगणाऱ्यांना विकासाचा तिरस्कार : मोदी

टीकाकारांना उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. दहा वर्ष ज्यांनी सत्ता उपभोगली, ते नेहमीच विकासाचा तिरस्कार करत असल्याचं यावेळी म्हणाले.

वडनगर : देशाची सूत्रं हाती घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी आज पहिल्यांदाज आपल्या जन्मगावी वडनगरचा दौरा केला. तब्बल सहा किमीच्या रोड शोनंतर  जनतेला मार्गदर्शन करताना, टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं. दहा वर्ष ज्यांनी सत्ता उपभोगली, ते नेहमीच विकासाचा तिरस्कार करत असल्याचं यावेळी म्हणाले. केंद्र सरकारने विकासाच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना पंतप्रधान म्हणाले की,  वाजपेयी सरकारच्या काळात सर्वात पहिल्यांदा आरोग्यासंदर्भात देशाचं धोरण निश्चित करण्यात आलं. पण दहा वर्ष ज्यांनी सत्ता उपभोगली, ते विकासाचा नेहमीच तिरस्कार करत आले आहेत. पण आमच्या सरकारने विकासासाठी नवी धोरण बनवलं. 'वडनगरच्या मातीतले संस्कार माझ्यात रुजले' वडनगरबद्दल बोलताना मोदी पुढे म्हणाले की, "आज मी जो काही आहे, तो याच मातीत रुजलेल्या संस्कारांमुळे आहे. या मातीतच लहानाचा मोठा झालो." कर्नाटकमधील जनरल करियप्पाची एक आठवण सांगिताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "करियप्पा जेव्हा आपल्या गावी आले होते. त्यावेळी ते म्हणाले की, माझं जगभरातून आदरातिथ्य झालं. पण आपल्यामध्ये जो सम्नान, जो गौरव मिळतो, त्याचा अनुभव काही वेगळाच असतो." वडनगरच्या भूमीला पंतप्रधानांचं वंदन ते पुढे म्हणाले, या संपूर्ण क्षेत्राने माझ्यावर खूप प्रेम केलं. मी तुम्हा सर्वांना वंदन करतो. मी जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो, त्यावेळी सर्वात आधी पुरात्त्व खात्याला वडनगरमध्ये खोदकाम करण्याच्या सूचना केल्या. या खोदकामातून जे काही प्राप्त झालं, ते संपूर्ण जगासाठी आकर्षणाचं केंद्र बनलं. या खोदकामानंतर वडनगरमध्ये 2500 वर्षांपासून मनुष्यवस्ती असल्याचं पुरात्त्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसेच चीनचे जगप्रसिद्ध बौद्ध भिख्खू ह्वेनसांग यांनीही वडनगरमध्ये वास्तव्य केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. इंद्रधनुष्य मध्ये सर्वांनी सहभागी व्हा इंद्रधनुष्य योजनेबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, "आज वडनगरमध्ये अनेक कार्यक्रमाद्वारे लोकहिताच्या कामांचं लोकार्पण झालं. पण यातील महत्त्वाचा म्हणजे, इंद्रधनुष योजनेचं लोकार्पण. देशातील ज्या मुलांचं लसीकरण होत नाही. त्यांना या मोहिमेतून नक्कीच लाभ होईल. त्यामुळे या योजनेत सर्वांनी सहभागी व्हावं." मोदी व्यासपीठावर, तर त्यांचे भाऊ जनतेत दरम्यान, या कार्यक्रमावेळी एक घटना सर्वांचंच लक्ष्य वेधून घेत होती. पंतप्रधान मोदी मंचावरुन जनतेला संबोधित करत होते. तर त्यांचे लहान भाऊ पंकज मोदी जनतेत राहून सर्वसामान्यांप्रमाणे मोदींचं भाषण ऐकत होते. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने त्यांच्याशीच बातचित केली, त्यावेळी आपण एक सर्वसामान्य व्यक्ती आहोत. कुणीही व्हीआयपी व्यक्ती नसल्याचं प्रांजळपणे कबूल केलं. पंतप्रधान मोदींचं UNCUT भाषण पाहा

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Embed widget