एक्स्प्लोर

मेधा पाटकर अन् नर्मदा योजनेचा संदर्भ देत पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, नर्मदा योजनेला विरोध करणाऱ्यांसोबत...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत राहुल गांधींचे (Rahul Gandhi)  नाव न घेता काँग्रेस नेते (Congress) आणि भारत जोडो यात्रेवर (Bharat Jodo Yatra)  निशाणा साधला आहे.

Gujarat Election 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) सध्या गुजरातच्या निवडणुकीच्या निमित्ताने  (Gujarat Election) तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत राहुल गांधींचे (Rahul Gandhi)  नाव न घेता काँग्रेस नेते (Congress) आणि भारत जोडो यात्रेवर (Bharat Jodo Yatra)  निशाणा साधला आहे. मोदी म्हणाले, 'तीन दशकांपासून नर्मदा धरण प्रकल्प रखडवलेल्या एका महिलेसोबत काँग्रेसचा एक नेता पदयात्रा काढताना दिसला.' नर्मदा धरणाच्या विरोधात असलेल्यांच्या खांद्यावर हात ठेवून तुम्ही पदयात्रा काढताय, असा सवाल काँग्रेसला विचारा, असं देखील पंतप्रधान म्हणाले. नर्मदा धरण बांधले नसते तर काय झाले असते? असा सवाल देखील त्यांनी केला. 

पीएम मोदींनी मेधा पाटकर यांच्यावर गुजरातची इतकी बदनामी केल्याचा आरोप करताना म्हटलं की, जागतिक बँकेने या प्रकल्पासाठी निधी देणे बंद केले.   नर्मदा प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांसोबत काँग्रेसचा एक नेता उभा असल्याचे चित्र  प्रसारित झाले आहे. अनेक दशकांपासून त्यांनी प्रकल्प थांबवण्यासाठी सर्व काही प्रयत्न केले आणि जागतिक बँकेचा एकही पैसा गुजरातमध्ये पोहोचू नये याची काळजी घेतली, असा आरोपही मोदींनी केला.

'भाजपला जनतेचा मोठा आशीर्वाद मिळतोय'

पंतप्रधान म्हणाले, "आमच्या मेहनतीचे फळ आहे की गुजरातमध्ये जो कृषी विकास दर उणे होता, तो आज दुहेरी अंकांवर पोहोचला आहे." पंतप्रधान पुढे म्हणाले की, 'दोन दशकांच्या आमच्या एकत्रित प्रयत्नांचे परिणाम म्हणजे भाजपला जनतेचा मोठा आशीर्वाद मिळत आहे.'  

पंतप्रधान मोदी म्हणाले, "गुजरातला विकसित आणि समृद्ध बनवणे हे भाजपचे ध्येय आहे. म्हणूनच तुमचे आशीर्वाद माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. गुजरातचे नागरिक कच्छ-काठियावाडचे नागरिक माझे शिक्षक आहेत आणि तुम्ही मला प्रशिक्षित केले आहे."
 
मेधा पाटकरांचा भारत जोडो यात्रेत सहभाग

मेधा पाटकर यांनी 17 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात आलेल्या भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला होता.  यादरम्यान राहुल गांधी मेधा पाटकर यांच्या खांद्यावर हात ठेवून चर्चा करताना दिसून आले होते. त्यावर भाजपने आधीही जोरदार टीका केली होती. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मेधा पाटकर यांच्या यात्रेतील उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी म्हटलं होतं, की "काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी गुजरात आणि गुजराती लोकांबद्दलचा द्वेष वारंवार दाखवला आहे."

गुजरातच्या रणधुमाळीत राहुल गांधी उद्या पहिल्यांदा उतरणार
गुजरातच्या रणधुमाळीत राहुल गांधी उद्या पहिल्यांदा उतरणार आहेत. भारत जोडो यात्रेचा उद्या विश्रांतीचा दिवस आहे. त्या दिवशी राहुल गांधींच्या दोन सभा गुजरातमध्ये होणार आहेत. दुपारी 2 वाजता सुरतमध्ये तर संध्याकाळी 4.15 वाजता राजकोटमध्ये राहुल गांधींची सभा होणार आहे. या सभांमध्ये राहुल गांधी पंतप्रधानांच्या वक्तव्यावर काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget