![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PM Modi Shirdi Visit : पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, शिर्डीत साईबाबांच्या चरणी होणार लीन
PM Modi Maharashtra Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 26 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील शिर्डी येथे येणार आहेत. ते साईबाबांचे दर्शन घेतील आणि विविध कार्यक्रमांची पायाभरणी करतील.
![PM Modi Shirdi Visit : पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, शिर्डीत साईबाबांच्या चरणी होणार लीन PM Modi Shirdi Visit PM Modi to inaugurate various projects in Shirdi tomorrow 26 October PM Modi Maharashtra Tour update PM Modi Shirdi Visit : पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, शिर्डीत साईबाबांच्या चरणी होणार लीन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/25/562ea3a3bbe9df98e03e96f0ef12ccfa1698225177180322_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
PM Modi Shirdi Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उद्या, 26 ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावर (Maharashtra Tour) येणार आहेत. पंतप्रधान मोदी गुरुवारी शिर्डीत (Shirdi Visit) दाखल होणार आहेत. पंतप्रधान मोदी 26 ऑक्टोबरला शिर्डीत पोहोचणार आहेत. पंतप्रधान मोदी दुपारी 1 वाजता शिर्डी येथे पोहोचतील. पंतप्रधान मोदी साईबाबा समाधी मंदिरात (Shirdi Sai Baba Temple) दर्शन घेऊन मंदिरात पूजाही करणार आहेत. दिवसभर सामान्य भक्तांना साईमंदिरात दर्शन नियमितपणे सुरू राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीतील साई मंदिराला भेट देणार असल्याने केवळ आर्धा तास मोदी आल्यानंतर समाधी मंदिरात प्रवेश बंदी असेल.
शिर्डी साई मंदिरात दर्शन, विविध प्रकल्पांचं लोकार्पण
पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावेळी महाराष्ट्रातील जनतेला मोठी भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विविध प्रकल्पांनी पायाभरणी करण्यात येणार आहे. शिर्डी साई मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान दुपारी 2 वाजता निळवंडे धरणाचे जलपूजन करणार आहेत. यावेळी निळवंडे धरणाच्या कॅनलचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते केले जाईल. त्यानंतर पंतप्रधान दुपारी 3.15 वाजता विविध प्रकल्पांची पायाभरणी करतील. सुमारे 7 हजार 500 कोटींच्या या प्रकल्पात आरोग्य, रेल्वे, रस्ते, तेल, गॅस क्षेत्रातील प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांचे भूमीपूजन केल्यानंतर पंतप्रधान सायंकाळी 6.30 वाजता गोव्यासाठी रवाना होतील.
PM @narendramodi to visit Maharashtra, Goa tomorrow. PM will reach Shirdi in Ahmednagar District of Maharashtra tomorrow afternoon, to perform pooja and darshan at Shri Saibaba Samadhi Temple. He will also inaugurate new Darshan Queue Complex at the temple. pic.twitter.com/cWmbUXHiXZ
— All India Radio News (@airnewsalerts) October 25, 2023
2018 नंतर मोदी शिर्डीच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 2018 नंतर पुन्हा एकदा शिर्डीच्या दौऱ्यावर येत असून दौऱ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून बैठकांचा सपाटा सुरु आहे.
पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा कसा असेल?
पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी 26 ऑक्टोबरला दुपारी अहमदनगर जिल्ह्यात दाखल होतील. तिथे ते साईबाबा मंदिरात दर्शन घेतील आणि पूजा करतील. त्यानंतर विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतील आणि गोव्यासाठी रवाना होतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
PM Modi MP Visit : महाकाल नगरी उज्जैनमधून पंतप्रधान मोदी निवडणुकीचं रणशिंग फुंकणार, मध्य प्रदेशात भव्य सभा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)