एक्स्प्लोर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बांग्लादेश दौऱ्यावर, बांग्लादेशचा 'गार्ड ऑफ ऑनर' स्वीकारणार

कोरोना काळानंतरचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Modi) हा पहिलाच विदेश दौरा आहे. पंतप्रधान बांग्लादेशच्या (Bangladesh) स्वर्ण जयंती कार्यक्रम आणि वंगबंधू शेख मुजीबर रेहमान शताब्दी वर्ष कार्यक्रमात सामील होतील.

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बांग्लादेशच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी बांग्लादेश सज्ज झाला असून बांग्लादेश सरकारकडून पंतप्रधान मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जाणार आहे.

सध्याकाळी पंतप्रधान मोदी बांग्लादेशच्या स्वर्ण जयंती कार्यक्रम आणि शेख मुजिबीर रहमान यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात सामील होणार आहेत.  त्यानंतर ते संध्याकाळी बंगबंधू-बापू संग्रहालयाचे उद्धाटन करणार आहेत.

बांग्लादेशच्या या दोन दिवसीय दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे मतुआ समाजासाठी महत्वाच्या असलेल्या मंदिराचे दर्शनही घेणार आहेत. मतुआ समाजाचा पश्चिम बंगालमध्ये 30 मतदारसंघात प्रभाव आहे. तर 27 तारखेला ते सातखिडाच्या सुरेश्वरी देवी मंदिराचे दर्शन घेणार आहेत.  

बांग्लादेश या वर्षी त्या देशाच्या 50 वा स्वातंत्र्यदिवस साजरा करत आहे. तसेच हेच वर्ष वंगबंधू शेख मुजीबर रेहमान यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. तसेच या वर्षी भारत आणि बांग्लादेशच्या संबंधांना 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पंतप्रधानांनी कोरोनाच्या काळानंतर आपल्या पहिल्या दौऱ्यासाठी बांग्लादेशची निवड केली आहे.

भारताचे बांग्लादेशसोबत असणारे संबंध मजबूत आणि सौदार्हपूर्ण आहेत. नेबरहुड फर्स्ट या धोरणातंर्गत भारताने बांग्लादेशला वेळोवेळी मदत केली आहे. कोरोना संकटाच्या काळातही भारताने बांग्लादेशला मोठी मदत केली आहे. भारताने बांग्लादेशला कोरोना लसीचे 90 लाख डोस दिले आहेत. ही मदत इतर कोणत्याही देशाला दिलेल्या मदतीपेक्षा जास्त आहे. मोदींच्या या दौऱ्यादरम्यान पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी आणि बांग्लादेशच्या ढाका या दोन शहरांदरम्यानच्या रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी यांनी बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यासोबत व्हर्च्युअली मीटिंग केली होती. त्यावेळीच या दौऱ्याची घोषणा करण्यात आली होती. जानेवारी 2021 मध्ये बांग्लादेशचे परराष्ट्र सचिव मसूद बिन मोमेन भारत भेटीवर आले होते. त्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे बांग्लादेशच्या दौऱ्यावर गेले होते.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget