एक्स्प्लोर

पंतप्रधान मोदींकडून उत्तराखंडला 17,500 कोटींची भेट, 23 प्रकल्पांचे केलं उद्‌घाटन  

PM Modi to visit Uttarakhand  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमध्ये 17,500 कोटी रुपयांच्या 23 प्रकल्पांचे उद्‌घाटन केलं.

PM Modi to visit Uttarakhand  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उत्तराखंडमध्ये 17,500 कोटी रुपयांच्या 23 प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी केली. 45 वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या लाखवार बहुउद्देशीय प्रकल्पाची पंतप्रधान मोदी यांनी पायाभरणी केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8700 कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पांचे देखील उद्‌घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी सभेला संबोधित करताना  पंतप्रधानांनी कुमाऊंसोबत प्रदीर्घ काळापासून संबंध असल्याची आठवण करून दिली. तसेच उत्तराखंडी टोपी देऊन सन्मानित केल्याबद्दल उत्तराखंडमधील लोकांचे आभार मानले.

उत्तराखंडमधील लोकांचे सामर्थ्य या दशकाला उत्तराखंडचे दशक बनवेल, असे पंतप्रधान म्हणाले. हे दशक उत्तराखंडचे दशक आहे, असे त्यांना का वाटते हे  यावेळी पंतप्रधानांनी स्पष्ट केले. उत्तराखंडमध्ये वाढणारी आधुनिक पायाभूत सुविधा, चार धाम प्रकल्प, नवीन रेल्वे मार्ग बांधले जात आहेत, यामुळे हे दशक उत्तराखंडचे दशक ठरेल. जलविद्युत, उद्योग, पर्यटन, नैसर्गिक शेती आणि संपर्कव्यवस्था या क्षेत्रात उत्तराखंडने केलेल्या प्रगतीचाही त्यांनी उल्लेख केला ज्यामुळे हे दशक उत्तराखंडचे दशक होईल असे मोदी म्हणाले.

डोंगराळ भागांच्या विकासासाठी अथकपणे काम करणारा विचारप्रवाह आणि डोंगराळ प्रदेशांना विकासापासून दूर ठेवणारा विचारप्रवाह यातील फरक पंतप्रधानांनी स्पष्ट केला. ते म्हणाले की, 'विकास आणि सुविधांच्या अभावी अनेकांनी या प्रदेशातून इतर ठिकाणी स्थलांतर केले. सबका साथ सबका विकास या भावनेने सरकार काम करत आहे.' उधम सिंग नगर येथे एम्स ऋषिकेश उपग्रह केंद्र आणि पिथौरागढ येथील जगजीवन राम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पायाभरणीमुळे राज्यातील वैद्यकीय पायाभूत सुविधा मजबूत होतील, असेही ते म्हणाले. आज जी पायाभरणी होत आहे ती प्रतिज्ञापत्रे आहेत ज्याचा पूर्ण संकल्पाने पाठपुरावा केला जाईल. ते म्हणाले की, भूतकाळातील वंचना आणि अडचणी आता सुविधा आणि सुसंवादात रूपांतरित होत आहेत. हर घर जल, शौचालय, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना यांच्या माध्यमातून गेल्या सात वर्षात महिलांना जीवनात नवनवीन सुविधा आणि सन्मान मिळत असल्याचेही मोदी यांनी यावेळी सांगितले.  

पंतप्रधान म्हणाले की, सरकार गंगोत्री ते गंगासागर या अभियानामध्ये गुंतले आहे. स्वच्छतागृहे, उत्तम सांडपाणी व्यवस्था आणि जलशुद्धीकरणाच्या आधुनिक सुविधांमुळे गंगेत पडणाऱ्या नाल्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्याचप्रमाणे नैनितालमधील तलावांची व्यवस्था ठेवली जात आहे. केंद्र सरकारने नैनिताल येथील देवस्थळ येथे देशातील सर्वात मोठी ऑप्टिकल दुर्बीण उभारली. यामुळे देश-विदेशातील शास्त्रज्ञांना नवी सुविधा तर मिळालीच, शिवाय या क्षेत्राला नवी ओळख मिळाली आहे. आज दिल्ली आणि डेहराडूनमध्ये सरकार सत्तेच्या लालसेने चालत नाही तर सेवेच्या भावनेने चालते.

महत्त्वाच्या बातम्या

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
Pune News: राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Pune MPSC protest: पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
WCL 2026 : 6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
Embed widget