एक्स्प्लोर

आंबेडकरांच्या नावाने राजधानी दिल्लीत पहिली वास्तू

राजधानी दिल्लीतल्या डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलं.

नवी दिल्ली : जे राजकीय पक्ष बाबासाहेबांच्या नावाने मतं मागतात त्यांना बाबासाहेबांपेक्षा आजकाल भोले बाबांची आठवण येऊ लागलीय, अशा शब्दांत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधींवर हल्लाबोल केला. राजधानी दिल्लीतल्या डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलं त्यावेळी ते बोलत होते. आंबेडकरांच्या नावाने राजधानीत होणारी ही पहिलीवाहिली वास्तू असल्याने याचं विशेष महत्व आहे. समाजाच्या सर्वसमावेशक विकासासाठी हे सेंटर काम करत राहील, आंबेडकरांचा विचार सर्वदूर पोहोचण्यास त्यामुळे मदत होईल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. दिल्लीतल्या 15, जनपथ रोडवर हे सेंटर उभारण्यात आलं आहे. डॉ. आंबेडकर इंटरनॅशनलची ही इमारत बुद्धिस्ट आणि आधुनिक शैलीच्या संगमातून उभारलेली आहे. या ठिकाणी सेमिनार आणि कॉन्फरन्स हॉल, शिवाय तीन प्रेक्षागृह, सुसज्ज लायब्ररी उभारण्यात आली आहे. दिल्लीत साडेतीन एकरावर उभी राहिलेली ही वास्तू बाबासाहेबांच्या अभ्यासकांसाठी एका तीर्थक्षेत्रासारखी व्हावी, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली. दरम्यान, पटेलांप्रमाणेच आंबेडकरांवरही काँग्रेसने कसा अन्याय केला, याचा पाढा यावेळी मोदींनी भाषणातून वाचला. 1992 मध्ये नरसिंहराव हे पंतप्रधान असताना बाबासाहेबांच्या नावाने अशा केंद्राची संकल्पना मांडली गेली होती. मात्र इतकी वर्षे हे काम पूर्ण करण्याची तसदी कुणी घेतली नाही, असा आरोप मोदींनी केला. या आंबेडकर सेंटरसोबतच दिल्लीतलं अलीपूर रोड, मुंबईतलं इंदू मिल या स्मारकांचं कामही वेगाने पूर्ण केलं जाईल, असं मोदी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
Ankita Bhandari Case: अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
Election Commission : 'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह
'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune FDA Action: जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
Peshawar School: शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
Beed News: वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
Ankita Bhandari Case: अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
Hingoli Crime News: माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
Mandar Devasthali First Reaction On Allegation: 'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
Embed widget