अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 वर्षांपुर्वी अयोध्येला आले होते. त्याचवेळी त्यांनी अयोध्येत राम मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता. अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार महेंद्र त्रिपाठी यांनी दिली आहे. महेंद्र त्रिपाठी यांच्याकडे त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येला भेट दिली तो फोटो देखील आहे.


याबाबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार महेंद्र त्रिपाठी म्हणाले की, '29 वर्षांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येला आले होते. त्यावेळी मी त्यांना प्रश्न विचारला होता की, आता अयोध्येला तुम्ही पुन्हा कधी भेट देणार आहात? त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, 'राम मंदिर बनवल्या नंतरच मी अयोध्येला येईल आणि हा संकल्प आता प्रत्यक्षात उतरत आहे. याचा मी स्वतः पुरावा आहे. 1991 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत अयोध्येत आले होते. त्यावेळी त्यांना इतकं ओळखत देखील नव्हतं. परंतु ते त्यावेळी सतत मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत दिसत होते. त्यावेळी त्यांचे व्यक्तीमत्वदेखील छान होते. मी त्यांच्याबाबत चौकशी केली असता मला माहिती मिळाली की, ते गुजरात राज्याचे प्रभारी आहेत. यानंतर मी त्यांची भेट घेतली. स्वतःची ओळख करून दिली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्याकडून अयोध्येबाबत संपुर्ण माहिती घेतली. मी देखील त्यांना सर्व माहिती समजावून सांगितली. मुलाखतीच्या शेवटी मी त्यांना प्रश्न विचारला की, आता तुमचं अयोध्येला पुन्हा येणं कधी होईल? तेव्हा ते म्हणाले की, आता मी मंदिराच्या निर्मितीच्या वेळी अयोध्येला पुन्हा येईल आणि आता हे वाक्य खरं ठरलं आहे. राम मंदिराच्या निर्मितीच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 तारखेला अयोध्येत येत आहेत.



पत्रकार महेंद्र यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा संकल्प केवळ काही लोकांना माहिती होता. हा संकल्प स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला सांगितल्याचा दावा ते करत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, ज्यावेळी 14 वर्षांचा वनवास संपवून राम अयोध्येत आले होते त्यावेळी अक्षरशः अयोध्येत दिवाळी साजरी करण्यात आली होती. आता देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 वर्षांनंतर अयोध्येत जात आहेत. त्यानिमित्ताने अयोध्येत दिवाळीसारखा जल्लोष करण्याची तयारी सुरु आहे.


पत्रकार महेंद्र त्रिपाठी यांच्याजवळ शिवसेनेच्या काही कारसेवकांचे देखील फोटो आहेत. ज्यामध्ये तत्कालीन आमदार पवन पांडे आपल्या कार्यकर्त्यांसोबत बाबरी मशिदीच्या दगडांसोबत दिसत आहेत. महेंद्र त्रिपाठी यांच्या म्हणण्यानुसार, शिवसेनेचं बाबरी मशिद पाडण्यातील योगदान या फोटोतून स्पष्ट होतं आहे. ज्यावेळी शिवसैनिकांनी बाबरी मशिद पाडली त्यावेळी आपल्यासोबत त्यांनी मशिदीचे दगड देखील नेले होते. ज्याला मीर बॉकी म्हणतात. बाबरी मशिद पाडण्यात कामगिरी बजावणाऱ्या त्या शिवसैनिकांचं त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कौतुक देखील केलं होतं.


महत्त्वाच्या बातम्या :