PM Modi Gujarat Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मातोश्री हिराबा यांचा आज 100 वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं पंतप्रधान मोदी आईची सदिच्छा भेट घेण्यासाठी गुजरातमध्ये त्यांच्या भावाच्या घरी पोहोचले. आईच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त भेट घेतली. यापूर्वी 11 मार्च रोजी पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असताना अहमदाबादमध्ये त्यांनी आईची भेट घेतली होती. आईच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी वडनगर येथील हटकेश्वर मंदिरात पुजा करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या दोन दिवसीय गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. 


पंतप्रधान मोदी यांनी आईचा आशिर्वाद घेतला


पंतप्रधान मोदी यांनी 100व्या वाढदिवसानिमित्त आई हिराबा यांचे पाय धुतले आणि त्यांनी पुष्पहार घालून त्यांच्या चरणांना स्पर्श करत आईचा आशिर्वाद घेतला.






 


21 हजार कोटींच्या योजनाचं उद्घाटन आणि पायाभरणी
यावेळी पंतप्रधान मोदी 21 हजार कोटी रुपयांच्या योजनाचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आज सकाळी 9.15 वाजता पावागड टेकडीवरील श्री कालिका मातेच्या पुनर्विकसित मंदिराचं उद्घाटन करतील. त्यानंतर रात्री 11.30 वाजता मोदी हेरिटेज फॉरेस्टलाही भेट देतील.


गुजरात अभिमान मोहिमेत घेणार भाग
पंतप्रधान आज दुपारी 12:30 वाजता वडोदरा येथे गुजरात गौरव अभियानात सहभागी होतील. यावेळी पंतप्रधान 21,000 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करुन गुजरातला मोठी भेट देणार आहेत.


16 हजार कोटींच्या रेल्वे प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणी
आज गुजरात गौरव अभियानादरम्यान पंतप्रधान 16 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यावेळी फ्रेट कॉरिडॉरचा 357 किमी लांबीचा न्यू पालनपूर-मदार विभागाचं लोकार्पण करण्यात येईल.


तसेच, 81 किमी लांबीच्या पालनपूर-मिठा विभागाचे विद्युतीकरण, सोमनाथ, सुरत, उधना आणि साबरमती स्थानकांच्या पुनर्विकासाची आणि 166 किमी अहमदाबाद-बोताड विभागाच्या गेज हस्तांतरणाची पायाभरणीही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे.


कार्यक्रमासाठी जय्यत तयारी


पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्तच्या कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरू आहे. कार्यक्रमस्थळी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या