Indian Railway : धार्मिक प्रवासाला (तीर्थयात्रा) प्रोत्साहन देण्यासाठी  21 जूनपासून भारत गौरव ट्रेन चालवली जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाने याची जबाबदारी आयआरसीटीसीला दिली असून ही ट्रेन दिल्लीहून नेपाळमधील जनकपूरपर्यंत जाईल.  


भारत गौरव ट्रेन आतून आणि बाहेरून सुंदर सजवण्यात आली आहे. बाहेरून ट्रेनमध्ये देशी नृत्यशैली प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. ताजमहाल, हवा महाल, काशी मंदिर आणि सूर्य मंदिर यांसारख्या वैभवशाली ठिकाणांचे चित्रण करण्यात आले आहे. या ट्रेनमध्ये देशाच्या अभिमानाच्या ठिकाणांची छायाचित्रेही लावण्यात आली आहेत. याशिवाय ट्रेनमध्ये एक पूजा कक्षही बांधण्यात आला आहे. या कक्षाचा उपयोग प्रवाशांना सामूहिक जेवण, कीर्तन आणि बैठकीसाठी करण्यात येईल.


प्रभू रामाशी संबंधित मुख्य ठिकाणी ही ट्रेन जाणार आहे. 18 दिवसांच्या प्रवासानंतर अठराव्या दिवशी दिल्लीच्या सफदरजंग स्थानकावर ही ट्रेन परत येईल. या ट्रेनमध्ये एकूण 10 डबे असून यामध्ये 600 प्रवासी प्रवास करू शकतात. संपूर्ण ट्रेन थर्ड एसी आहे. यामध्ये एका व्यक्तीचे भाडे सुमारे 62 हजार असून यामध्ये रेल्वे प्रवासासह जेवण, हॉटेल आणि बसचे भाडे समाविष्ट आहे.


रेल्वे मंत्रालयाने या ट्रेनची जबाबदारी IRCTC ला दिली आहे. IRCTC ने आपला सर्वात मोठा खानपान भागीदार RK Associates & Hoteliers Pvt Ltd ची खासगी भागीदार म्हणून निवड केली आहे. भारत गौरव गाड्यांच्या मालिकेतील पहिली ट्रेन भारत दर्शन अंतर्गत चिन्हांकित रामायण सर्किटवर भगवान श्री राम यांच्या जीवनाशी संबंधित ठिकाणांचा दौरा करेल. नेपाळमधील जनकपूर येथील राम जानकी मंदिराला भेट देण्याचाही रेल्वे दौऱ्यात समावेश असेल.


21 जून रोजी ही ट्रेन दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकावरून 18 दिवसांच्या टूरवर निघेल. प्रवाशांसाठी या ट्रेनमध्ये एकूण 10 डबे असतील, ज्यामध्ये एकूण 600 प्रवासी प्रवास करू शकतील. या ट्रेनमध्ये पॅन्ट्री कोचची सुविधा असेल, ज्यामुळे पर्यटकांना फक्त त्यांच्या बर्थवर शाकाहारी जेवण दिले जाईल. यासोबतच सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक आदींचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.  


किती आहे तिकीट?
IRCTC ने या 18 दिवसांच्या प्रवासासाठी प्रति व्यक्ती 62370 रुपये शुल्क निश्चित केले आहे. पेमेंटसाठी एकूण रक्कम 3, 6, 9, 12, 18 आणि 24 महिन्यांच्या हप्त्यांमध्ये पूर्ण केली जाऊ शकते. या टूर पॅकेजच्या किमतीत रेल्वे प्रवासासोबतच प्रवाशांना स्वादिष्ट शाकाहारी भोजन, बसमधून पर्यटनस्थळे पाहणे, एसी हॉटेल्समध्ये राहण्याची सोय, गाईड आणि विमा इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित पात्रतेनुसार सरकारी/पीएसयू कर्मचारी या प्रवासात LTC सुविधेचा लाभ घेऊ शकतात.